सोनपेठ येथे विस्तारीत समाधान योजना व कार्यशाळा शिबीर संपन्न - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 12 फ़रवरी 2018

सोनपेठ येथे विस्तारीत समाधान योजना व कार्यशाळा शिबीर संपन्न

सोनपेठ येथे विस्तारीत समाधान योजना व कार्यशाळा  शिबीर संपन्न

देवगाव फाटा -सेलु-पाथरी-सोनपेठ-इंजेगाव ह्या महामार्गासाठी १हजार कोटी रुपये मंजुर झाले- बबणराव लोणीकर


सोनपेठ(राजेश खेडकर)
महाराष्ट्र  शासन  गरीबांना केंद्रबिंदू माणून त्यांचा सर्वांगीन विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असुन यापुढे थेट ग्रामपंचायत स्तरावर जाऊन लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी कटीबद्ध राहाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज दि. १२फेब्रुवारी रोजी सोनपेठ  येथील छञपती शिवाजी महाराज संस्कृतीक सभागृह येथे अयोजीत विस्तारीत समाधान योजना व कार्यशाळा  शिबीराप्रसंगी व्यक्त केले.
    यावेळी मंचावर  नगराध्यक्षा सौ.जिजाबाई राठोड, विठ्ठलराव रबदाडे, गणेशराव रोकडे आप्पर जिल्हाधिकारी आन्नासाहेब शिदे, डॉ. प्रफुल्ल पाटील, नगर परिषदचे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकार पी.पृथ्वीराज, गटविकास अधिकारी मोहन अभंगे, गटशिक्षणधिकारी शौकत पठाण, भाजपा परभणी जिल्हा चिटणीस शिवाजीराव मव्हाळे, बालाप्रसाद मुंदडा, रमाकांत जहागिरदार, बाबासाहेब फले आदींसह विविध खात्यांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात पुढे बोलताना  ना.लोणीकर म्हणाले की, सोनपेठ तालुक्याला मागील ३वर्षात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जलयुक्त शिवार योजना, सिंचन विहीर योजना, महीला बचत गटांना कर्जपुरवठा, शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाच्या वतीने ट्रक्टर वाटप, गँस वाटप, यासह विविध योजना साठी हजारो कोटी रुपये देऊन जनतेच्या विकासात भर पाडली आहे. तसेच सोनपेठ तालुका हद्दीत २३४ कोटी रुपयांचे निधी उपलब्ध करुन देवगाव फाटा -सेलु-पाथरी-सोनपेठ-इंजेगाव ह्या महामार्गासाठी १हजार कोटी रुपये मंजुर झाले असुन या राष्ट्रीय माहामार्गाचे भुमिपुजन महाराष्ट्राचे माननिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लवकरच होणार आसल्याचे सांगीतले.
या वेळी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना साहीत्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमापुर्वी भाजपा परभणी जिल्हा उपाध्यक्ष बालाप्रसाद मुंदडा यांच्या निवासस्थानी मा.बबनराव लोणीकर यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व अभार तहसीलदार जिवराज डापकर यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व विभागाचे खातेप्रमुख सरपंच ग्रामसेवक तलाटी चेअरमन लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें