सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीस मिळाली विदेशातुन आर्थिक मदत
--------------------------------------------------------शिव जयंती निमित्त होनार ग्रंथदान
-------------------------------------------
सोनपेठ(राजेश खेडकर)
वाचन संस्कृती जोपासन्यासाठी सोनपेठ येथील वाचन प्रेमी नागरीक मागील कांही वर्षांपासुन ग्रंथ वाचन चळवळीच्या माध्यमातुन प्रयत्न करीत आहेत. यासाठी शहर व परीसरातील अनेक ग्रंथप्रेमींचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
तालुक्यातील नागरीक सार्वजनिक समारंभ, लग्न समारंभ, वाढदिवस आदी कार्यक्रमात नजीकच्या शाळेच्या ग्रंथालयाल पुस्तके भेट देत आहेत. या उपक्रमामुळे तालुक्यातील अनेक शाळा ग्रंथ समृद्ध झाल्या असुन शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना पुस्तकांचा लाभ होत आहे.
ग्रंथ वाचन चळवळीच्या या समाजोपयोगी उपक्रमाची सोशल मिडीयाच्या फेसबुक व व्हॉट्सप या माध्यमातुन मोठ्या प्रसिद्धी होत असुन; जगभरातील अनेकजन याविषयी चर्चा करत या उपक्रमास सहकार्य करण्याचे अश्वासन देत आहेत.
अशाचप्रकारची आर्थिक मदत आखाती देशातील बहरीन येथुन चळवळीस नुकतीच प्राप्त झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मराठवाड्यासारख्या अविकसीत भागाच्या लातूर येथील तरून श्री.सोनेराव राजेसाहेब गायकवाड हे बहरीन येथे एका कंपनीत उप व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. मात्र विदेशात राहुनही त्यांनी आपला गाव व शिक्षण घेतलेली शाळा कायम लक्षात ठेवली. आपल्या मुलांना वाचना साठी पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी सोनेराव गायकवाड यांनी ५०००/- रूपयांची आर्थिक मदत चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर यांच्या बँक खात्यात नुकतीच पाठविली आहे. या रक्कमेतुन तालूक्यातील कांही शाळांना आगामी शिव जयंती दिनी पुस्तके भेट देण्यात येनार असल्याचे सांगुन राजेश खेडकर यांनी सोनेराव गायकवाड यांचे ग्रंथदान करण्यासाठी आर्थिक मदत पुरविल्याबद्दल चळवळीच्यावतीने आभार व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें