गेवराई तालूका ग्रंथालय संघाची आज गढी येथे बैठक - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 14 फ़रवरी 2018

गेवराई तालूका ग्रंथालय संघाची आज गढी येथे बैठक

गेवराई तालूका ग्रंथालय संघाची आज गढी येथे बैठक

तालूक्यातील ग्रंथालय चळवळी संबंधीत सर्वांनी हजर रहावे-सिताराम गव्हाणे मामा


सोनपेठ(राजेश खेडकर)
आगामी सोलापूर व फळा (ता.पालम जि.परभणी) येथे होनाऱ्या ग्रंथालय संघाच्या अधिवेशनास उपस्थित राहण्या साठी व ईतर विषयांवर चर्चा करण्या साठी गेवराई तालूका ग्रंथालय संघाची आज दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ रोजी गढी येथील वाचनालयात दुपारी ठिक १२.०० वाजता बैठकीचे आयोजन केले आहे.
यावेळी १७ फेब्रुवारी सोलापूर येथे होनाऱ्या अधिवेशन व मराठवाडा विभागीय फळा ता.पालम जि.परभणी येथील अधिवेशन तसेच तसेच गेवराई तालुका कार्यकारणी निवड आणि वाचनालय व कर्मचाऱ्यांसाठी भविष्यातील योजना यावर सविस्तर विचार विनिमय करण्यात येनार आहे. बैठकीस विजय पोकळे, वसुदेव गायकवाड व अनिल गलांडे हे हजर रहाणार आहेत. या महत्वपुर्ण बैठकीस तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजर रहावे असे आवाहन सिताराम गव्हाणे मामा, विठ्ठल जाधव, भिमराव जाधव, भगवान तुरे, काळे सर, पदमराज वैराळ, चंद्रकांत इंगोले, चंद्रकांत ठोसर, अशोक शेळमकर, पटेल, भागवत वराट, धनंजय बजगुडे, पवळ, पवार आदींनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें