सोनपेठ तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिट उभ्या पिकांचे मोठे नुकसान - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 13 फ़रवरी 2018

सोनपेठ तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिट उभ्या पिकांचे मोठे नुकसान

सोनपेठ तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिट

उभ्या पिकांचे मोठे नुकसान


सोनपेठ (राजेश खेडकर)
सोनपेठ तालूक्यातील वडगाव, वैतागवाडी, निळा, उखळी यासह अन्य गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाचा जबर तडाखा बसल्याची घटना आज (दि.१३ फेब्रुवारी २०१८ मंगळवार रोजी) दुपारी ३-३०च्या सुमारास घडली आहे आहे.
सोनपेठ तालुक्यात हवामान खात्याच्या अंदाज खरा ठरत सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह दुपारी ३-३० वाजन्याच्या सुमारास गारांसह अवकाळी पावसास सुरुवात झाली; यात शेतातील उभ्या असलेल्या ज्वारी, करडई, गहू, हरभरा या पिकांसह अंबा, टरबुज, खरबुज आदी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यातील वडगाव, वैतागवाडी, निळा, वंदन, वडगांव आदी गावांमध्ये अचानक दुपारच्या सुमारास बोरा येवढ्या आकाराच्या गारांचा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये शेतातील उभी पिके जमीनदोस्त होऊन मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहाणी झाली नाही.
गारपिटग्रस्त भागाचे प्रशासनाकडुन सर्व्हेचे काम तात्काळ हाती घेतले असुन, शासकिय नियमाप्रमाणे योग्यती कार्यवाही  सुरु असल्याची माहिती  तहसीलदार जिवराज डापकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें