श्रीकृपा डुघरेकर हीचे यश
सेलू / प्रतिनिधीनरहर कुरुंदकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुरुंदा ता.वसमत जि. हिंगोली आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भा. शि. प्र. संस्था अंबाजोगाई संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी कु.श्रीकृपा किरणराव डुघरेकर ( इयत्ता ७ वी ) हीला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.दि .९ फेब्रु .शुक्रवार रोजी कुरुंदा या ठिकाणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पार पडली. आजचं शिक्षण दिशाहीन होतय? या समर्पक विषयावर तीने मांडणी केली.
तिच्या यशाबद्दल स्थानिक कार्यवाह किरणराव डुघरेकर ,केंद्रिय कार्यकारणी सदस्य सुधीरराव चौधरी ,मु.अ. अनिल कौसडीकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तीचे अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें