शिक्षण सक्षम बनवते ....भावना नखाते - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 7 फ़रवरी 2018

शिक्षण सक्षम बनवते ....भावना नखाते

शिक्षण सक्षम बनवते ....भावना नखाते

नूतन प्राथमिक शाळेत रंगले स्नेहसंमेलन.
सेलू (प्रतिनिधी)
                 कला ,खेळ याला जीवनात महत्त्व असून कला व खेळांमधून निश्चित करिअर घडविता येते. मात्र कला व खेळामध्ये  करिअर घडवताना शिक्षणाकडे दुर्लक्ष होता कामा नये कारण शिक्षण हेच माणसाला सक्षम बनवते असे प्रतिपादन जि.प.उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती भावना नखाते यांनी केले .
                 नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित सौ. सावित्रीबाई बद्रीनारायणजी  बिहाणी नूतन प्राथमिक शाळेत ६फेब्रुवारी रोजी  आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून भावना अनिलराव नखाते बोलत होत्या त्याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे  अध्यक्ष डॉ एस .एम .लोया ,चिटणीस डि.के. देशपांडे ,दत्तराव पावडे विमलताई नखाते ,सुखानंद बेंडसुरे  यांची उपस्थिती होती
                 यावेळी बोलताना  भावना नखाते म्हणाल्या की ग्रामीण भागातील विद्यार्थी हे विविध कला गुणांमध्ये हुशार आहेत त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शनाची गरज असते त्यामुळे शिक्षक व पालक यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे पालकांनी विद्यार्थ्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. जिवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनातून  मेहनत ,जिद्द व चिकाटीने अभ्यास करून पक्षाप्रमाणे भरारी घेण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी अंगीकारली पाहिजे .सेलू च्या शैक्षणिक वैभवामध्ये नूतन शिक्षण संस्थेचा मोठा मोलाचावाटा आहे .नुतन शिक्षण संस्थेच्या प्रगतीबद्दल भावना नखाते यांनी गौरव उद्गगार काढले
               याप्रसंगी विविध स्पर्धेत गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला .त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विविध गीतावर  सर्वांगसुंदर असे कलाविषकाराचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.
             मी दप्तर बोलतोय लघु नाटिका सर्वांनाच भावली त्याचबरोबर संत गाडगेबाबा यांच्या भूमिकेतून स्वच्छता अभियान चा संदेश दिला गेला. कब बुलबुल मार्गदर्शक शिक्षक उल्हास पांडे सोनाली कबुली कबुरे  ,रामकौंवर कुंभार व त्यांच्या संचांनी मान्यवरांना सलामी दिली.
बालसभा संचलन कल्पना चौधरी यांनी केले तर सुत्रसंचालन अनिल रत्नपारखी यांनी केले.यशस्वी तेसाठी मुख्याध्यापिका रेवती देशपांडे ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें