समाधान शिबिराच्या माध्यमातून १ लाख लोकांना लाभ देणार -ना.बबनराव लोणीकर - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 7 फ़रवरी 2018

समाधान शिबिराच्या माध्यमातून १ लाख लोकांना लाभ देणार -ना.बबनराव लोणीकर

समाधान शिबिराच्या माध्यमातून १ लाख लोकांना लाभ देणार -ना.बबनराव लोणीकर

सेलु: प्रतिनिधी
 गोरगरीबांना  शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराच्या माध्यमातून 1 लाख लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन आहे,अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

समाधान शिबिराच्या आयोजनाचा आढावा ना.लोणीकर यांनी सेलू येथील साई नाटयगृहात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी.,माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर,अभय चाटे आदि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून परभणीत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून ना.लोणीकर पुढे म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक महत्वाकांशी योजना आहेत.त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकाना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. गोरगरीबांचे जीवनमान सुधारण्यासाठी जनहिताच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे घरकुल मिळत आहे.सौभाग्य योजनेमुळे विद्युत व्यवस्था होत आहे. शेतकरी हिताच्या अनेक योजनामुळे शेतकरी स्वावलंबी होत आहेत. महिलांच्या व वयोवृध्दांच्या हिताच्या योजनांमुळे सामाजिक न्यायाची भूमिका स्पष्ट होत आहे. दलित, बेरोजगार आणि मागासांच्या उन्नतीसाठी योजनांच्या मार्फत प्रयत्न होत आहेत. असेही ते म्हणाले.

समाधान शिबिराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर मोठयाप्रमाणात लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन असून सर्व विभाग प्राथम्याने लाभ देण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. याचा निरंतर आढावा जिल्हाधिकारी घेणार आहेत. त्याचा सविस्तर अहवाल शासनाला सादर होणार आहे.गरजू आणि पात्र लाभार्थ्यांनी प्राधान्याने लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करुन ना. लोणीकर यांनी शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन केले.

शासनाच्या योजना सर्वापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी समाधान शिबिराचा उपक्रम राबविला जात असल्याचे सांगून जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी सेवा हमी कायद्याची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी समाधान शिबिराची माहिती देणा-या फेसबुक पेजची माहिती देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश दृकश्राव्य पध्दतीने दाखविण्यात आला.

माजी आ रामप्रसाद बोर्डीकर राहुल लोणीकर विनोद बोराडे सहाय्यक उपजिल्हाधिकारी राहूल कर्डिले तहसीलदार स्वरूप कंकाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र डासाळकर उपसभापती सुंदर गाडेकर माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे श्री रामप्रभू मुंढे तालुका अध्यक्ष संजय साडेगावकर जिल्हा उपाध्यक्ष डॉ साडेगावकर जनार्दन सोळंके युवक जिल्हाध्यक्ष अरविंद थोरात गुलाबराव लाटे प्रभाकर इंगळे अर्जुन बोरूळ पंकज निकम साहेबराव जाधव अनिल पवार प्रभाकर इंगळे शहराध्यक्ष संदीप मुरकुटे विष्णू मिसाळ अभिजीत रोडगे  मुकुंद गजमल

विठ्ठल को कर विजय कास्टे शिवाहरी शेवाळे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुभाष मोहकरे तर आभार प्रशांत थारकर या बैठकीस जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी, पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते. यावेळी लाभार्थ्यांना योजनांच्या लाभाचे वाटप ना.लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें