तिन शाळा मिळुन आगळी वेगळी शिव जयंती साजरी... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 23 फ़रवरी 2018

तिन शाळा मिळुन आगळी वेगळी शिव जयंती साजरी...

तिन शाळा मिळुन आगळी वेगळी शिव जयंती साजरी...


शेख सलीम
  प्रतिनिधी :भोकरदन

  भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी गावातील तीन जिल्हा परिषद शाळा मिळुन अगळी वेगळी शिव जयंती साजरी करण्यात आली.हा कार्यक्रम गावातील जिल्हा परिषद शाळेत साजरा केला यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष रविंद्र साबळे व प्रमुख पाहुने व्याख्याते तथा शिक्षक के.डी.वाघ,पञकार मधुकर सहाने यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्रथम गावातुन शाळेतील मुलांची भव्य रॅली काढण्यात आली होती.मुलांनी शिवाजी महाराज, जिजाऊ माता,मावळे यांच्या पोशाक परिधान केला होता,महिलांनी घरासमोर रांगोळी काढल्या होत्या,महिलांनी या मुलांची ओवाळणी केली...
   जिल्हा परिषद शिक्षक तथा कवी के.डी.वाघ यांनी शिवाजी महाराज यांच्या जिवनावर प्रकाश टाकत स्वच्छतेविषयी जनजागृतीही केली.ते पुढे म्हणाले कि,आपण आपले गाव हे हिवरे बाजार,पाटोदा गावासारखे आदर्श गाव करू शकता यासाठी युवकांनी एकञ येण्याची गरज आहे,
  शिवाजी जन्माला यावा पण दुसर्याच्या घरात,हि भावना दुर करता प्रथम आपण आपल्या घरातील जिजाऊचा सन्मान करावा,तरच आपण १९ फेब्रुवारीची जयंती साजरी झाल्याचा खरा आनंद होऊल असे वाघ यांनी बोलतांनी सांगितले,
 
  युवकांना दिला संदेश
आजकालची मुलं काय करतायत तर व्हाट्सअॅप्स आणि फेसबुकवर व्यस्थ असतात,पण आपण मोबाईलच्या माध्यमातुन का होईना आपण आपल्या गावाचे नाव हे महाराष्टाच्या कानाकोपर्यापर्यंत पोहचु शकतो.युवकांनी शिवाजी महाराजांची पुस्तके वाचावी व त्यातुन तुम्हाला खुप काही शिकायला मिळेल.शिवरायांनी कोणाची काॅफी केली नाही तर मग आपण का कोणाची काॅफी करावी असे ही के.डी.वाघ यांनी मार्गदर्शन करतांनी युवकांना संदेश दिला.

   यावेळी ग्रामसेवक गावंडे,तीन शाळेचे मुख्याध्यापक पी.व्ही.राजगुरू,डि.व्ही.घोडे,पी.बी.लोखंडे,शिक्षक के.एस.साबळे,सुखदेव लोखंडे सह सर्व शाळांचे अध्यक्ष व सदस्य तथा गावातील युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें