गोकुळ येथे सात दिवसीय श्रम संस्कार शिबिर सांगता समारोह मोठ्या उत्साहात संपन्न
शे.सलिम.
भोकरदन : तालुक्यातील गोकुळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठ अंतर्गत स्व एड. एस. डी. देशमुख महाविद्यालयाच्या वतीने सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये विविध उपक्रम राबवून कार्यक्रमाची सांगता समारोह दि.23 फेब्रु.2018 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रा.रणवीरसिंह देशमुख,तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. डी. एस. कळंबे,प्राचार्य.डॉ.डी. एस. फोलाने हे होते.
यावेळी डॉ. डी. एस. फोलाने म्हणाले की, प्रत्येक राष्ट्रिय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिरात मनापासुन काम केल्यास खुप गोष्टी शिकता येतात म्हणून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आशा श्रम संस्कार शिबिरात मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यानी सहभाग घेवून देशसेवा, समाजासाठी आपले योगदान दयावे असेही डॉ. फोलाने शेवटी म्हणाले.
डॉ. डी. एस.कळंबे म्हणाले कि,यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, प्रा. रणवीरसिंह देशमुख यांनीही उपस्थित विद्यार्थ्याना सखोल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी प्रा. टि. आर. पाबळे (रा. से.यो कार्यक्रम अधिकारी),प्रा. एस. एस. लोखंडे,प्रा. डी. डी.फोलाने,श्री.के.पि.जोगदंडे,श्री.एस. एस. गाढे, श्री. संजय जाधव,श्री.गणेश भंगरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें