सोनपेठ येथील क्रांतीनगर तांडा वसतीतील सात घरे आगीत भस्मसात - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 23 फ़रवरी 2018

सोनपेठ येथील क्रांतीनगर तांडा वसतीतील सात घरे आगीत भस्मसात

सोनपेठ येथील क्रांतीनगर तांडा वसतीतील सात घरे आगीत भस्मसात

* मोठ्या प्रमाणात आर्थिक हाणी, आगीचे कारण मात्र अज्ञात*

सोनपेठ(राजेश खेडकर)
शहरातील क्रांती नगर तांडा येथे २२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास आग लागुन घरातील शेतमाल व संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
     येथील क्रांतीनगर तांड्यावर २२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली या आगीमुळे तांड्यावरील अर्जुन राठोड, उत्तम राठोड, किसन पवार, दत्ता राठोड या सह दोन ते तीन घराला आग लागुन घरात साठवुन ठेवलेला  कुंटलांशी कापुस व संसारोपयेगी सामान जळून खाक झाले असुन या घटनेत लाखों नुकसान झाले आहे. नगर परिषदेच्या अग्नीशामक दलाच्या जवानांनी केलेल्या अथक प्रयत्ना नंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने तांड्यावर कोणीही नसल्याने जिवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप समजु शकले नाही.
यापुर्वीही क्रांती नगर येथील ६ ते ७ घरांना शॉकसर्कीट मुळे आग लागल्याची घटना घडली होती. यात आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या घरांचा पंचनामा करूनही नुकसान झालेल्यांना कुठल्याही प्रकारची शासकीय मदत देण्यात आली नाही. यामुळे काल लागलेल्या आगीचा मोबदला कोन देनार?  असी चर्चा क्रांती नगरवासीयांत होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें