वलंगवाडी येथे शाळा खोलीचे मोठ्या थाटात वाजत गाजत उद्घाटन .. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 22 फ़रवरी 2018

वलंगवाडी येथे शाळा खोलीचे मोठ्या थाटात वाजत गाजत उद्घाटन ..

वलंगवाडी येथे शाळा खोलीचे मोठ्या थाटात वाजत गाजत उद्घाटन ..


दि. 20 फेब्रुवारी 2018 रोजी वलंगवाडी ता. सेलु येथील शाळेच्या नवीन खोलीचे उद्घाटन जिल्ह्याचे  शिक्षणाधिकारी(माध्यमिक) श्री.बी.आर.कुंडगिर तसेच युवा रुरल असोसिएशन चे महासंचालक श्री.दत्ता पाटील व एच.डी.एफ.सी.बँकेचे सीएसआर मँनेजर श्री किशोर सुतार  यांच्या शुभहस्ते  रिबिन कापुन  करण्यात आले. यावेळी बँड, ताशा वाजवुन तसेच फटाके वाजवुन मोठ्या थाटात उद्घाटन सोहळा पार पडला.
वलंगवाडी हे सेलु तालुक्यातील एक छोटसं गाव असून गावात जवळपास  सत्तर कुटुंब आहेत. गावाला जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही. तसेच गावातील शाळेसाठी एकच खोली चांगल्या स्थितीत होती , व एक खोली संपूर्णत: निकामी झालेली आहे व शाळेतील सर्व विद्यार्थी एकाच वर्गात बसत होते. गावातील ही विद्यार्थ्यांची शैक्षणिक समस्या युवा रुरल असोसिएशन या संस्थेने हेरली व एच.डी.एफ.सी. बँकेच्या आर्थिक सहाय्यातुन वलंगवाडी गावामध्ये शाळेकरिता एक नवीन सुसज्ज अशा पद्धतीची वर्गखोली बांधुन देण्यात आली.
युवा रुरल असोसिएशन ही नागपूरची सामाजिक संस्था आहे. गेल्या वीस वर्षापासुन महाराष्ट्रातील विविध भागात
ग्रामीण विकास, आदिवासी विकास , महिला सबलीकरण , वनहक्क , शिक्षण, आरोग्य व स्वच्छता, मानव अधिकार , पर्यावरण, क्रुषि , क्रुषि आधारित उपजीविका ईत्यादी विषयावर सातत्याने काम करत आहे व ग्रामीण ,आदिवासी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

मागील दीड वर्षापासुन परभणी जिल्ह्यातील पाच गावांमध्ये आंबेगाव,वलंगवाडी ता. सेलु तसेच गोपेगाव, निवळी ,पाटोदा ता.पाथरी येथे युवा रुरल असोसिएशन च्या वतीने एच.डी.एफ.सी. बँकेच्या आर्थिक सहाय्यातून एकात्मिक ग्राम विकास प्रकल्प राबवला जातो. व गेल्या दीड वर्षापासुन संस्थेने  केलेल्या वेगवेगळ्या कामांचा आढावा प्रास्ताविकामधुन प्रकल्प समन्वयक लखन दांडगे यांनी दिला.
 तत्पुर्वी शाळेतील पाचवीची विद्यार्थीनी प्रियंका जोगदंड हिने आपल्या मनोगतातुन युवा रुरल संस्था व एच.डी.एफ.सी.बँकेची गावाच्या विकासासाठी कशा पद्धतीने मदत होत आहे हे व्यक्त केले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने लवकरात लवकर शाळेसाठी एक शिक्षक द्यावा ही विनंती देखील शिक्षण अधिकारी यांना केली, व
शिक्षणाधिकारी श्री.बी.आर .कुंडगिर यांनी देखील  शाळेच्या  एका खोलीसाठी  व शाळेला अजुन एक शिक्षक मिळावा या करिता आपण शासनदरबारी  प्रयत्न व पाठपुरावा करु असे आश्वासन देखील दिले आहे.
युवा रुरल असोसिएशनचे महासंचालक श्री.दत्ता पाटील यांनी संस्थेची वेळोवेळी समाजातील असणारी भुमिका स्पष्ट केली , तसेच गावातील विकासासाठी गावकर्यांचा सहभाग कशा पद्धतीने  महत्वाचा आहे हे देखील त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातुन  पटवुन दिले.
तसेच या उद्घाटन सोहळ्याला आवर्जुन उपस्थित राहिलेले व ज्यांच्या आर्थिक सहाय्यातुन हे कार्य शक्य झाले असे एच.डी.एफ.सी.बँकेचे सी.एस.आर.मँनेजर किशोर सुतार यांनी मुलांना कशा पद्धतीने शिक्षीत कराव, साक्षर आणि शिक्षीत यातला फरक  पटवुन दिला, व आजच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थांना कशा पद्धतीने शिकवले पाहिजे या विषयी पालकांना व गावकर्यांना मार्गदर्शन  केले.
तसेच गावातील ईयत्ता नववीतील विद्यार्थीनी संगीता जोगदंड हिने देखील आपल्या मनोगतातून स्वचँछता आणि आरोग्य याचे महत्व गावकर्यांना पटवुन दिले.
तसेच दत्ता पाटील आणि किशोर सुतार यांच्या हस्ते शाळेला सोलार  पँनल भेट देण्यात आले, सर्वांना मिठाई वाटुन आनंद व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुञसंचलन शाळेचे मुख्यध्यापक श्री.गिरी सर यांनी केले तर आभार युवा रुरल असोसिएशन चे समन्वयक  दिवाकर देशमुख यांनी मानले.

तसेच यावेळी कार्यक्रमाला केंद्रप्रमुख महिफळ सर, गावचे ग्रामसेवक टकाळेे, परभणी येथील शंकर नागसाखरे, युवा रुरल असोसिएशनचे समन्वयक सविता गवारे, तसेच ग्रामसंप्रेरक शाम जोगंदंड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.डिगांबर शेळके , शाळेतील माजी शिक्षक श्री.फिरोज शेख , सर्व विद्यार्थी , पालक , महिला , गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गावकर्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसुन येत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें