युनिक सायन्स एकेडेमी मध्ये निरोप समारंभ संपन्न - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 22 फ़रवरी 2018

युनिक सायन्स एकेडेमी मध्ये निरोप समारंभ संपन्न

*युनिक सायन्स एकेडेमी मध्ये निरोप समारंभ संपन्न*


वालुर येथील सुप्रसिद्ध युनिक सायन्स एकेडेमी मध्ये इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी शेख जावेद तर प्रमुख अतिथि म्हणुन डॉ. शिंदे, डॉ. मुश्ताक़, पठाण रहेमान, संजय बोबडे, पठाण अफज़ल हे होते.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एकेडेमी विषयी आपले मनोगते व्यक्त केली आणि वर्षभर दिलेल्या ज्ञानाबद्दल आपले शिक्षक पठाण रहेमान आणि शेख जावेद यांचे आभार मानले.

प्रमुख पाहुन्यांनी देखील विद्यार्थ्यांना येणाऱ्या परिक्षेसाठी तसेच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुशावर्ता सोनवणे आणि सोनाली गोरे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात गावातील प्रतिष्ठित व्यक्ति देखील उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें