छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणा देनारे व्यक्तीमत्व आहे - प्रा.डॉ. संतोष रणखांब
सोनपेठ(राजेश खेडकर)
छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला प्रेरणा देनारे व्यक्तीमत्व आसल्याने प्रत्येक नागरिकांनी शिवचरित्राचा अभ्यास करायला पाहिजे असे प्रतिपादन प्रा.डॉ.संतोष रणखांब यांनी केले. पाथरी तालुक्यातील मौजे कानसुर येथील शिवसृष्टी प्रतिष्ठान ने आयोजित केलेल्या शिवजन्मोत्सवातील व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणुन बोलताना प्रा.डॉ.संतोष रणखांब यांनी शिवचरित्रातील वेगवेगळे किस्से सांगुन शिवाजी महाराज प्रत्येक क्षेत्रात कसे अव्वल होते ते सांगत, पंचक्रोशीत फक्त कानसुर याच गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुड पुर्णाकृती पुतळा आसल्याने गावाचे वैभव वाढले आसुन गावातील नागरिकांनी निर्व्यसनी राहुन आपल्या पाल्यांना शिक्षण देन्यासाठीच प्राधान्य दिले पाहिजे असेही यावेळी प्रा.डॉ.संतोष रणखांब यांनी सांगितले.
यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येथील माजी सरपंच श्रीनिवास शिंदे हे होते तर स्वागताध्यक्ष म्हणुन सोपानराव शिंदे होते. काॅ. दिपकराव लिपने, कवी पत्रकार गणेश पाटील, माऊली आदत, हनुमान रेंगे, कुंडलीकराव हारकळ व डाॅ.गजानन शिंदे आदीजनांची प्रमुख ऊपस्थिती होती.
यावेळी काॅ.लिपने यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर युवा कवी गणेश पाटील यांनीही 'जयंती-पुण्यतिथी" संदर्भात आपली कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नामदेव शिंदे यांनी तर आभार संतोष शिंदे यांनी मानले.
यावेळी गावासह पंचक्रोशीतील महिला व शिवप्रेमी नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवश्रृष्टी प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें