- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 5 फ़रवरी 2018

*अध्यात्माचा रमणीय अविष्कार म्हणजे शिक्षण : प्रा.संजय पिंपळगावकर*

समशेर खान
प्रतिनिधी.सेलू
अध्यात्म हे  शिक्षणरूपी इमारतीचा पाया असून अध्यात्माचा  रमणीय अविष्कार म्हणजे शिक्षण होय असे प्रतिपादन नूतन महाविद्यालयाचे प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले.ते ज्ञानाई इंग्लिश स्कूल च्या विविध गुणदर्शन अंतर्गत आयोजित वेशभूषा स्पर्धा या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.शिवाजी महाराज खवणे,श्री.के.बा.विद्यालय सेलू येथील उपक्रमशील शिक्षक योगेश ढवारे,सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, शिवाजी महाराजांच्या मातोश्री निर्मला खवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना परीक्षक योगेश ढवारे म्हणाले की,आपण एका ज्ञानाच्या चिरंतन अशा खळाळत वाहत जाणाऱ्या वृक्षाच्या थंडगार अध्यात्मरूपी छायेत आलो आहोत असाच काहीसा  स्वानुभव आला आहे. विशेषतः लहान बालकांना अशा स्पर्धासाठी तयार करणे हेच मूळी महाकठीण काम आहे.विद्यार्थ्यांनी ज्या प्रमाणे सादरीकरण केले ते निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांनी शिक्षक वर्ग व पालकांचे विशेष अभिनंदन केले.

सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड म्हणाले की, अशा प्रकारचे कार्यक्रम हे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देतात.यातुनच विद्यार्थी घडत असतात. असे कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जावेत असे ते म्हणाले.

अध्यक्षीय समारोपात शिवाजी दादा म्हणाले की, प्रत्येक मुलात काहीतरी विशेष दडलेले असते त्याचा शोध घेणे हे शिक्षकाचे काम आहे. आम्ही प्रवचनात नेहमी शिक्षक हा राष्ट्र विकासाचा खरा कणा आहे असे म्हणत असतो.गरज आहे ती अंग झटकून काम करून सक्षम पिढी घडवण्याची.
या प्रसंगी वेशभूषा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुवर्णा देवकते यांनी केले.तर आभार साधना बोराडे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सारीका जोशी,सविता बोराडे,साधना डुकरे, रोहिणी वाघमारे आदींनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमास पालकांची विशेषतः महिला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें