- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 4 फ़रवरी 2018

मोठी बातमी

सर्व महिलांना लागू होतो हिंदू वारसा हक्क कायदा – सर्वोच्च न्यायालय

शे.अजहर.
विशेष.प्रतिनिधी.
*नवी दिल्ली- वर्ष २००५ मध्ये हिंदू वारसाहक्क कायद्यात संशोधन करत वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलींना बरोबरचा हक्क देण्याची व्यवस्था केंद्र सरकारने केली होती. सर्व महिलांना हिंदू वारसा हक्क कायदा लागू होतो. हा कायदा २००५च्या आधी जन्म झालेल्या मुलींनाही लागू असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात स्पष्ट केले आहे.*

*या मुद्द्यावर न्यायमूर्ती एके सिकरी आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्यासमोर सुनावणी झाली. जन्मापासून मुलगीसुद्धा संपत्तीमध्ये भागीदार असेल. ज्याप्रमाणे मुलाला अधिकार व उत्तरदायित्व असते तसेच मुलीलाही लागू असेल. २००५च्याआधी मुलीचा जन्म झाला होता असे म्हणून वडिलोपार्जित संपत्तीमध्ये तिला हक्क देणे नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.*

*सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, वर्ष २००५च्याआधी दाखल आणि कायदा तयार केल्यानंतर प्रलंबित मालमत्तेशी निगडीत सगळ्या प्रकरणांवर हिंदू वारसा हक्क कायदा लागू होतो. मुलगा व मुलींना संपत्तीशी निगडीत प्रकरणांमध्ये बरोबरचा अधिकार देण्यासाठी कायद्यात बदल केला गेला होता. वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मागणाऱ्या दोन बहिणींच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या दोन बहिणींच्या भावांनी त्यांना संपत्तीमधून वाटा देण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी २००२ साली न्यायालयात धाव घेतली.*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें