- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 5 फ़रवरी 2018

रामेश्वर  प्रासादिक मंडळाच्या वतीने  अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन.

------------------------------------------------------------

सोनपेठ (राजेश खेडकर)
महाशिवराञी निमित्त  शहरातील रामेश्वर मंदिर येथे  श्री रामेश्वर प्रासादिक मंडळाच्या वतीने  याही वर्षी श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे  बुधवार  दि.०७ ते  बुधवार दि.१४ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. 

       श्रीमद् भागवत  कथा प्रवक्ते ह.भ.प.भागवताचार्य सौ.  न्यानेश्वरीताई बागुल (नाशिक)  या आपल्या  मधुर वाणीतुन कथा सांगणार आहेत. दैनंदिन कार्यक्रमात पहाटे  काकडा आरती, विष्णु सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन,दु. १ ते ५ श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ, हरिपाठ,राञी ९ ते ११ हरिकिर्तन होणार आहे.

     या निमित्त बुधवार दि.०७ रोजी  ह.भ.प.रामायणाचार्य सोमनाथ  महाराज बदाले यांचे हरि किर्तन होईल , गुरूवार  ह.भ.प.भागवताचार्य शशिकांत  महाराज कुलकर्णी,  शुक्रवार  ह.भ.प अर्जुन महाराज उगले बीड,  शनिवार  ह.भ.प.विनोदसम्राट जयराम  महाराज तांगडे (सेलूकर),  रविवार   ह.भ.प. बालाजी  महाराज शास्ञी परळीकर,  सोमवार  ह.भ.प.महामंडलेश्वर १००८ मनिषानंद महाराज पुरी   रूढीपाटी, मंगळवार  ह.भ.प.भागवताचार्य कुशल  महाराज पुरी,   बुधवार  ह.भ.प.भागवताचार्य पुरूषोत्तम  महाराज पाटील    यांचे सकाळी ११ ते १ काल्याचे किर्तन होणार असुन शेवटी  महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे. या धार्मीक कार्यक्रमाचा भावीक भक्तानी  लाभ घ्यावा असे अवाहन श्री रामेश्वर प्रासादिक मंडळ व  समस्त गावकरी मंडळी सोनपेठ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें