राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा समारोप
सोनपेठ(राजेश खेडकर)
येथिल कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा समारोप विटा (खु.) येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आ. व्यंकटराव कदम होते तर
मंचावर माजी जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर, तहसिलदार जिवराज डापकर, पो. नि. सोपान सिरसाट, लक्ष्मीकांत देशमुख, दशरथ सुर्यवंशी, रमाकांत जहागिरदार, हशिप्रमं चे अध्यक्ष परमेश्वरराव कदम, माजी पं स. सभापती मदनराव विटेकर , प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते, भगवान राठोड, दत्ताराव कोलते पाटील, दिगंबर ताल्डे, आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सात दिवशीय शिबीरात प्रबोधनात्मक व श्रमदानाचे कार्य करण्यात आले. याबद्दल विद्यार्थ्यांच्या या कामाचे कौतुक बोलताना तहसिलदार जिवराज डापकर यांनी केले. तसेच रमाकांत जहागिरदार, लक्ष्मीकांतराव देशमुख व मा. जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात मा. आ. व्यंकटराव कदम यांनी आपल्या जिवनात शिक्षणाचे फार महत्व असून शिक्षणाबरोबर श्रमप्रतिष्ठा महत्त्वाची असून व्यक्तीचा सर्वांगिन विकास होण्यासाठी म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व घेण्यासाठी रा. से. यो. च्या या शिबीरांची आवश्यकता असते. असे प्रतिपादन केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मदनराव भोसले - विटेकर, शिबीराचा अहवाल प्रा. डॉ. मारोती कच्छवे, तसेच सात दिवशीय कामकाजाचा आढावा प्रा. डॉ. शिवाजी अंभुरे यांनी मांडला. विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. सुत्रसंचालन प्रा. डॉ. मुक्ता सोमवंशी तर आभार प्रा. गोविंद वाकणकर यांनी मानले. यावेळी अँड. श्रीकांत विटेकर, अँड. आशोकराव यादव, शिवाजीराव भोसले, विलासराव कोकाटे, रफिकभाई कुरेशी, केशवराव भोसले, मुख्याध्यापक आर. डी. शेख, बनाळे, संभाजी शेळके, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरूण तुपसमिंद्रे, पत्रकार गजानन चिकणे, सुभाष सुरवसे, ग्रा. प. सदस्य व नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामसेवक लक्ष्मण पितळे, प्रा. डॉ. संतोष रणखांब भगवान मस्के, संभाजी उंडाळकर, अमोल भोसले, सुदर्शन बदाले, आसेफ आत्तार, संतोषी सावळे, व सर्व स्वयंसेवकांनी व नागरिकांनी प्रयत्न केले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें