- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 5 फ़रवरी 2018

राज्यशासनाने पेट्रोल, डिझेल  व गँस कर कपात करावा.
◆कांग्रेसची मागणी

समशेर खान.
सेलु(प्रतिनिधि) :सर्व सामान्य जनता महागाईने होरपळत निघत आहे. त्यातच शासनाच्या वतिने पेट्रोल, डिझेल व गँसच्या किंमतीत वाढ केल्याने सर्व सामान्य नागरीकांची कोंडी होत आसुन केंद्र सरकारने 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात दर कमी करण्याबाबत कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे सर्व सामान्य जनता हैराण झाली असून राज्य सरकारने प्रस्तावित अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेल व गँसवरील करकपात करुन सर्व सामान्यांना दिलासा देण्याची मागणी काँग्रेस कमिटीच्या वतिने सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सोमवार 5 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेल वरिल केंद्रीय उत्पादन शुल्क प्रतिलिटर 2 रुपयांनी कमी करुन रोडसेस प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढवले आहे यामुळे या किंमतीमध्ये कुठलीही कमी झाली नाही. उलट पेट्रोल, डिझेल 2.50 ते 3रुपयांनी महागले आहे. त्यामुळे सर्व सामान्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. तर प्रस्तावित राज्य सरकारच्या अर्थ संकल्पात पेट्रोल व स्वयपाकाच्या गँस वरील व्हंट(VAT) व राज्यकर कमी करुन राज्यातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी शहर काँग्रेस च्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी शहराध्यक्ष विनोद तरटे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक हेमंतराव आडळकर, पवन आडळकर, मिलिंद सावंत, संभाजी पवार, शेख ईरशाद, बाळासाहेब काजळे, दिलावर शेख, महेश राठोड, अनंत थोंबाळ, इरफान जमिनदार ,ईसाक पटेल, विनोद राजुरकर, गौस भाई, शेख कादर, अशोक राऊत, बापुराव डख, किशोर कव्हळे आदींनी पुढाकार घेतला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें