- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 5 फ़रवरी 2018

*मोठी बातमी*
*सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन बदल्यांचे नवे धोरण*

🔰🔰 *ऑनलाइन बदल्यांना शिक्षक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत आव्हान दिले होते*

⭕⭕ *बदल्यांसाठीच्या मोबदल्याची प्रथा रोखणार!*

✍✍ *संजय बापट, लोकसत्ता सौजन्य*

*मुंबई:-सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी मे-जून दरम्यान होणाऱ्या घाऊक बदल्यांमध्ये होणारी देवाण-घेवाण आणि वशिलेबाजी कायमची मोडीत काढण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यानुसार यापुढे या बदल्यांसाठी ग्रामविकास विभागाने शिक्षकांसाठी लागू केलेला ऑनलाइन बदल्यांचाच कित्ता गिरवला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक कायदा दुरुस्ती केली जाणार असून बदल्यांच्या या पारदर्शक धोरणाचा प्रस्ताव लवकच मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे. येत्या मे महिन्यापासून या धोरणानुसार बदल्या होतील, असा दावा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे..*

*राज्यात सुमारे सात लाख सरकारी अधिकारी -कर्मचारी असून दरवर्षी यातील काही टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. या बदल्या संबंधित विभागांच्या मंत्र्यामार्फत केल्या जातात. सार्वत्रिक बदल्यांमध्ये होणारे आर्थिक व्यवहार, तसेच वशिलेबाजी यामुळे वजनदार अधिकारी नेहमीच  आपल्या मर्जीनुसार महत्त्वाची कार्यकारी पदे पटकावतात. मात्र ज्यांच्याकडे वशिला नाही  किंवा ज्यांना देवाण-घेवाण संस्कृती मान्य नाही असे अधिकारी- कर्मचारी मात्र कायम अकार्यकारी पदावर वा अडगळीच्या ठिकाणी फेकले जातात. बदल्यांचा हंगाम वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणे लोकप्रतिनिधींसाठीही अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यातूनच वशिलेबाजीने बदल्या होत असल्याची चर्चा दरवर्षी कानावर येते. प्रशासनात रूजलेली ही भ्रष्ट संस्कृती नष्ट करण्याचा निर्धार आता मुख्यमंत्र्यांनी केला असून तसे निर्देश सामान्य प्रशासन विभागास दिले आहेत.*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें