राष्ट्रीय वरिष्ठ टेनिस व्हाँलीबाँल स्पर्धेत मध्ये प्रदेश, महाराष्ट्र,गुजरात सोलापूर विद्यापीठ, संघाची विजयी घौडदौड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 24 फ़रवरी 2018

राष्ट्रीय वरिष्ठ टेनिस व्हाँलीबाँल स्पर्धेत मध्ये प्रदेश, महाराष्ट्र,गुजरात सोलापूर विद्यापीठ, संघाची विजयी घौडदौड.

राष्ट्रीय वरिष्ठ टेनिस व्हाँलीबाँल स्पर्धेत मध्ये प्रदेश, महाराष्ट्र,गुजरात  सोलापूर विद्यापीठ, संघाची विजयी      घौडदौड.

लातूर ( समशेर खान)टेनिस व्हाँलीबाँल फेडरेशन आँफ इंडिया  यांच्या मान्यतेने लातूर जिल्हा व टेनिस व्हाँलीबाँल महाराष्ट्र असोसिएशन च्या वतीळने 19 वी राष्ट्रीय वरीष्ठ पुरुष व महिला टेनिस व्हाँलीबाँल स्पर्धा ,दि. 23 फेब्रुवारी रोजी सांय ५:०० वा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाऊन हाँल लातूर येथे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी टेनिस व्हाँलीबाँल खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवांड, उद्घाटक महापौर मा.सुरेश पवार, स्वागताध्यक्ष दिगंबर साके, प्रमुख पाहुणे टेनिस व्हाँलीबाँल महासंघ अध्यक्ष  भगवान पेद्दावाड, प्रा.डाॅ.प्रदिप देशमुख, महासंघ उपाध्यक्ष जनक टेकाळे, उपमहापौर देविदास काळे, मा.ओमप्रकाश साकोळकर, राज्य संघटना सचिव आनंद खरे, कोषाध्यक्ष दिनेश सिंगाराम,तिरूके डि.एस.  यशवंत वाडीकर, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते
                   स्पर्धेत देशभरातील १८ पुरुष तर 12 महिला संघ व व्यवस्थापक, प्रशिक्षक, एकुण २५० खेळाडू सहभागी  झाले आहेत. यात पाँडेचेरी, गुजरात, मध्ये प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओरिसा ,महाराष्ट्र, सौराष्ट्र , मुंबई, विदर्भ, सोलापूर विद्यापिठ यांचा समावेश आहे. या स्पर्धा प्रकाश झोतात दि. 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान संपन्न होत आहेत.
साखळी सामन्यात पुरुष गटात 
गुजरात संघाने तेलंगणा व सौराष्ट्र चा 2:0 सेट मध्ये पराभव केला तर ओरिसा वि कर्नाटक दरम्यान 2:0 सेट मध्ये ओरिसा विजयी ,मध्ये प्रदेश संघाने   सौराष्ट्र,महाराष्ट्र ,गुजरात, तेलंगणा संघास 2:0 सेट ने पराभव करत उपांत्य फेरीत दाखल झाला. महाराष्ट्र संघाने तेलंगणा व गुजरात संघाचा पराभव केला.
महिला गटात सोलापूर विद्यापीठ ने महाराष्ट्र, ओरिसा, दादर नगर हवेली संघाचा 2:0 सेट मध्ये पराभव करत उपांत्य फेरीत दाखल , तर महाराष्ट्र संघाने दादर नगर हवेली संघाचा 2:0 सेट मध्ये पराभव केला.
स्पर्धा यशस्वी ते साठी  राज्य सहसचिव गणेश माळवे,जिल्हा उपाध्यक्ष विनायक टेकाळे, जिल्हा सचिव संतोष कोले,भूषण भावे, अशोक परीट, प्रा. महेश पाळणे, प्रा. निशिकांत सदाफुले,विलास जाधव, दिनकर क्षिरसागर, केसरे सर , धनंजय नागरगोजे परिश्रम घेत आहेत. स्पर्धेस पंच प्रमुख प्रफुल्ल कुमार बन्सोड, डॉ. दशरथ देसिंगे, गणेश पाटील, स्मृती रंजन, काजुल यादव, उर्जा धिवोरा, जुलाह खुदूस, स्वाती बेने, राजेंद्र मगाडे, प्राची हुलावळे, हे काम पाहत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें