आज जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 24 फ़रवरी 2018

आज जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

आज जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

शमशेर खान.
सेलू: येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय आणि शब्दसह्याद्री प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने वि.वा.शिरवाडकर यांची जयंती,मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ५ ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पातळीवरची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, वरिष्ठ महाविद्यालय आणि खुल्या गटासाठी हस्ताक्षर व अमृतातही पैजेशी जिंकणारी माझी मराठी या विषयावर निबंध स्पर्धा आज रविवार  दि. २५ रोजी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वाचन कक्षात सकाळी १०.३० वाजता आयोजित केली आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी माझी माय बोली मराठी,शेतकय्रांचे राजे छञपती शिवाजी महाराज,नक्षञाचे देण देणारा कवी कुसुमाग्रज आणि माझा आवडता लेखक किंवा कवी हे विषय असून  या विषयांपैकी एका विषयावर विद्यार्थी पाच मिनिटात आपले वक्तव्य मांडू शकतील. या वक्तृत्व स्पर्धेच्या उद् घाटन प्रसंगी कवी यशवंत मकरंद,संविधान सन्मान दलाचे अध्यक्ष रवी पंडीत,पञकार शिवाजी आकात,शरद ठाकर,डॉ.भालचंद्र धर्मापूरीकर यांच्यासह परीक्षक म्हणून काशिनाथ पल्लेवाड,दिगंबर रोकडे,अनिता कानडे,यांची उपस्थिती असणार आहे.स्पर्धा यशस्वीतेसाठी सुरेश हिवाळे,महादेव आगजाळ व  संयोजक परिश्रम घेत आहेत.

Tezznews24 web news channel.

News @advertice contact.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें