बिलोली च्या अल ईम्रान प्रतिष्ठान ला पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हा युवा मंडळ पुरस्कार प्रदान
( नांदेड / प्र ) भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय दिल्ली अंतर्गत नेहरू युवा केद्र नांदेड च्या वतीने पोलिस परेड मैदानावर पर्यावरणमंत्री तथा पालकमंत्री ना. रामदासजी कदम यांच्या हस्ते अल ईम्रान प्रतिष्ठान बिलोली या संस्थेचे सचिव ईम्रान खान यांना उत्कृष्ट जिल्हा युवा मंडळ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
◼सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक,स्वच्छता,पर्यावरण, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती,आरोग्य,कला,क्रिडा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अल ईम्रान प्रतिष्ठान बिलोली या संस्थेची दखल घेऊन सन २०१६-२०१७ या वर्षी चा उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह,मानपत्र व रोख २५०००/-रू प्रजासत्ताक दिनानिमित्त पर्यावरणमंत्री तथा पालकमंत्री रामदासजी कदम यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
◼ यावेळी जिल्हाधिकारी श्री.अरुणजी डोंगरे, पोलिस महानिरीक्षक श्री.चिरंजीव प्रसाद, पोलिस अधीक्षक चंद्रशेखर मिना,अप्पर जिल्हाधिकारी श्री.संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. जयराज कारभारी,म.न.पा.आयुक्त श्री.गणेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. श्री.अशोक शिनगारे, उद्यान अधिक्षक श्री.मिर्झा शकील बेग,एन.वाय.के.लेखापाल श्री. कुलदीपशिंह शाहू,श्री.मा.आ.हेमंत पाटील ,श्री.मा.आ. डी .पी . सावंत,श्री.मा.आ.अमर राजूरकर, महापौर सौ .शिला भवरे ,जि.प. अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर ,गोविंदराव नागोलीकर, प्रकाश कौडगे , मनोज भंडारी,राम चव्हाण,आदी मान्यवाराची उपस्थिती होती.
◼ अल ईम्रान प्रतिष्ठान ला पुरस्कार मिळाल्याबद्दल मा.आ.सुभाषजी साबने,मा.आ.वसंतरावजी चव्हाण, मा.हणमंतराव बेटमोगरेकर,मा.रावसाहेब अंतापुरकर ,मा.भीमराव
शिसागर,श्रीनिवास चव्हाण,शेख जाकिर,रवि सगंवार,पंकज शिवभगत,शेख जानिभाई, अलीम खान(नगरसेवक),मोहम्मद शोएब(नगरसेवक)दुष्यंत सोनाळे(नगरसेवक),फेरोज खान(नगरसेवक) मसूद अहेमद,खान(नगरसेवक)वाजीद जागीरदार(नगरसेवक)महेंद्र पिपले(नगरसेवक)नवीद खान,नवनाथ भद्रे, शेख.मुशी,खालेद चाऊस,प्रकाश सोनकांबळे आदिनी शुभेच्छा दिल्या.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें