केरळ विधानसभा अध्यक्षाच्या चष्म्याची किंमत 50 हजार, बिल भरलं राज्य सरकारने
तिरुवनंतपुरम : केरळच्या विधानसभा अध्यक्षांचं चष्मा खरेदी प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. कारण, तब्बल 50 हजार रुपयाच्या चष्म्याचं बिल राज्य सरकारनं भरलं आहे. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला राज्य सरकारच्या सचिवालयाने दिलेल्या उत्तरातून ही बाब समोर आली आहे.केरळ विधानसभा अध्यक्ष पी. श्री रामकृष्णन यांना दिलेल्या निधीतून त्यांनी कुठे-कुठे खर्च केला याबाबतची माहिती आरटी आय कार्यकर्ते आणि कोचीचे वकील डी.बी.बीनू यांनी राज्य सरकारकडे माहिती मागवली होती. त्याला उत्तर देताना राज्य सचिवालयाने सांगितलं की, अध्यक्षांना 5 ऑक्टोंबर 2016 ते 19 जानेवारी 2018 पर्यंतच्या खर्चासाठी सव्वा चार लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यातील 49 हजार 900 रुपये त्यांनी आपल्या चष्म्यावर खर्च केले. यातील चार हजार 900 रुपयाची चष्म्याची फ्रेम, तर 45 हजार रुपये लेंसवर खर्च करण्यात आले.यावर आरटीआय कार्यकर्ते बानू यांनी सांगितलं की, “रामकृष्णनव यांनी भरलेल्या बिलाची प्रत देखील मागितली होती. पण सचिवालयाने ती देण्यास नकार दिला. त्यामुळे विधानसभा सचिवालयाने अपूर्ण माहिती दिल्याने, त्याविरोधात राज्य माहिती अधिकार आयोगाकडे दाद मागणार आहोत.”
Tezznews24 web news channel
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें