दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
परभणी:- निम्न दुधना प्रकल्प जलाशयातून दुधना नदीपात्रात मंगळवार दि.6 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 11 वाजता 1200 क्युसेकने पाणी सोडण्यात येत असल्याने दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
परभणी शहर महानगरपालिका यांच्याकरीता क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असल्याने जालना पाटबंधारे विभागाअंतर्गत निम्न दुधना प्रकल्प जलाशयातून दुधना नदीपात्रात मंगळवार दि.6 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी 11 वाजता 1200 क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे दुधना नदीकाठच्या गावातील कोणत्याही रहिवासी व शेतकऱ्यांनी नदी पात्रात जाऊ नये किंवा जनावरे, पशु नदीपात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. यासाठी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा उपसा विद्युत मोटारीद्वारे कोणत्याही गावकऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रयोजनासाठी करु नये. नदी पात्रात काही मालमत्ता असल्यास ती सुरक्षित स्थळी हलवण्यात यावी. दुधना नदीकाठच्या गावांतील रहिवासी व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी व पाण्याचा उपसा होणार नाही या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी संबंधित तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहेत असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें