दररोज पाणी द्या आणि पाणीपट्टी 1800/- करा अन्यथा तिव्र आंदोलन: पाण्यासाठी 'समन्वय संघर्ष समिती' ची स्थापना
इमरान खान.
प्रतिनिधी.
औरंगाबाद दि 4.औरंगाबाद शहरात पिण्याचे पाण्याचा पुरवठा दररोज करण्या इतका जलसाठा उपलब्ध असतांना औरंगाबाद महानगरपालिका नागरिकांना काही भागात 2 दिवसाने, काही भागांत 4 दिवसाने तर कही भागांत 6 दिवसाने पिण्याचे पाण्याचा पुरवठा करते तर अनेक ठिकाणी टॅंकर द्वारे अनियमित पाण्याचा पुरवठा करते. पाणीपट्टी मात्र 4070/- रुपये वसूल करते. एवढी जास्त पाणीपट्टी महाराष्ट्रातील कोणतीही महानगरपालिका वसूल करीत नाही. दिवसातुन दोनदा पाणी पुरवठा करुन मालेगाव मनपा पाणीपट्टी घेते, पुणे मनपा 1200/- रुपये, नाशिक मनपा 1600/- रुपये तर कल्याण- उल्हासनगर-डोंबिवली महानगरपालिका 1200/- पाणीपट्टी घेते..
औरंगाबाद महापालिकेने पण पाणीपट्टी फक्त 1800/- रुपये घ्यावी आणि दररोज पाण्याचा पुरवठा करावा या मागणी साठी जन आंदोलन उभे करण्यासाठी आज 'समन्वय संघर्ष समिती' ची स्थापना करण्यात आली.
या समितीचे निमंत्रक समाजसेवक राहुल इंगळे, विष्णू पुंगळे आणि भारत गायकवाड असून विधी सल्लागार अॅड कल्याण खोले पाटील आहेत. समन्वय संघर्ष समिती चे सदस्यात समाजसेवक डाॅ ग़फ्फार क़ादरी, सुभाष परदेशी, लुटे पाटील, कांतीलाल नीरपगारे, दादाला इखारे, काकासाहेब काकडे, राजु जगधने, विनोद सोनवणे, रणरे पाटील, विकास अहीरे, प्रवीण वकरे,फेरोज खान, नासेर सिद्दिकी, अरुण बोर्डे, संदीप कंठे, ज्ञानेश्वर नागरे, दिलीप भोजने, हाजी अख्तर खान, रफीक पठाण, शेख अहमद आणि हाजी इसहाक यांचा समावेश आहे.
आज दुपारी समन्वय संघर्ष समिती नी पत्रकार परिषदेत स्थापनेची घोषणा केली तसेच 23 फेब्रुवारीला महानगरपालिके समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें