विद्यापीठाच्या अभ्यासमंडळावर नियुक्तीबद्दल प्रा. डॉ. जाधव व प्रा. डॉ. चव्हाण यांचा सत्कार - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 12 फ़रवरी 2018

विद्यापीठाच्या अभ्यासमंडळावर नियुक्तीबद्दल प्रा. डॉ. जाधव व प्रा. डॉ. चव्हाण यांचा सत्कार

विद्यापीठाच्या अभ्यासमंडळावर नियुक्तीबद्दल प्रा. डॉ. जाधव व प्रा. डॉ. चव्हाण यांचा सत्कार


सोनपेठ(राजेश खेडकर)
येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाचे प्रा. डॉ. आशोक जाधव व वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. आशोक चव्हाण यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या अभ्यासमंडळावर कुलगुरूंमार्फत निवड झाली आली असून याबद्दल त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासमंडळावर कुलगुरूंमार्फत निवडप्रक्रिया सुरू असून कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक नुकताच महात्मा फुले शिक्षक परिषदेने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवलेले प्रा. डॉ. आशोक जाधव यांची लोकप्रशासन विभागाच्या अभ्यास मंडळावर तसेच सहाय्यक प्राध्यापक प्रा. डॉ. आशोक चव्हाण यांची वाणिज्य व व्यापार अभ्यास मंडळावर निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी सत्कार केला.
यावेळी सर्व प्राध्यापक,  शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें