छत्तीसगढ येथील शालेय राष्ट्रीय साँफ्टबाँल स्पर्धेस अपुर्वा माळेगांवकर हीची निवड
परभणी (समशेर खान)क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या वतीने राज्य शालेय साँफ्टबाँल स्पर्धेत 17 वर्ष मुली गटात गांधी विद्यालय परभणी च्या कु. अपुर्वा केशव माळेगांवकर हीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून महाराष्ट्र राज्य साँफ्टबाँल संघात झाली आहे.
राष्ट्रीय शालेय साँफ्टबाँल स्पर्धा राजनांदगाव( छत्तीसगड) येथे दि.13 ते 16 फेब्रुवारी 2018 दरम्यान येथे संपन्न होणार असुन.
महाराष्ट्र राज्य संघाचे राष्ट्रीय स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीर गोदींया येथे दि .8 ते 12 फेब्रुवारी दरम्यान संपन्न होणार आहे.
अपुर्वा हिनी आजपर्यंत तीन राज्य साँफ्टबाँल स्पर्धेत प्रतिनिधित्व केले.
सदर खेळाडूस प्रा.प्रसेनजित बनसोडे ,यांचे मार्गदर्शन लाभले आहे
ह्या उज्वल यशा बदल पी.आर .जाधव जिल्हाक्रीडाधिकारी सी.व्ही. साखरे, प्रा. रंमाकांत बनसोडे,ओंकार खोत, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यानी अभिनंदन करून स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें