पशुधनाची संख्या वाढविण्याची गरज--डाँ. बाबासाहेब ठोंबरे
शमशेर खान.
सेलु(प्रतिनिधि):-शेतीला पुरक दुग्ध व्यवसाय असल्यास पत आणि खत दोन्ही मिळते पुर्वीच्या काळी पशुधनावर श्रीमंती ओळखल्या जात असे त्यावेळी प्रती तीन व्यक्तीमागे एक गोवंश होते मात्र भविष्यात म्हणजेच 2040 पर्यंत प्रति चोविस व्यक्तीमागे एक गोवंश राहणार आहे. ही विषमता दूर करण्याच्या हेतुने शेतक-यांनी पशुधनाची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापिठाचे पशु संवर्धन विभाग प्रमुख डा.बाबासाहेब ठोंबरे यांनी केले आहे. ते बळीराजा राज्य स्तरीय कृषी प्रदर्शानातील मराठवाड्यातील पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय व दिशा या विषयावरील परिसंवादात मंगळवार 20 फेब्रुवार रोजी बोलत होते यावेळी डाँ. रुतुराज साडेगावकर, प्रा. राजाराम झोडगे, हरिराम कव्हळे, गणेशराव काष्टे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. डाँ. ठोंबरे म्हणाले की, पशु संवर्धन करतांना चांगली जनावरे विकत मिळत नाहीत ती निर्माण करावी लागतात. देशाच्या एकुण उत्पादनात हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या भागात 70टक्के दुध उत्पादन होते तर उर्वरित 70 टक्के भागात 30 टक्के दुधाचे उत्पादन होते यामुळे दुधाची मोठी मागणी असुन देखील पशुधनाच्या कमतरतेमुळे ती मागणी पुर्ण होत नाही. पशु संवर्धन करतांना पैदास, आहार ,व्यवस्थापन व आरोग्य आदी चार गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्याकडे केवळ 20 टक्के गोवंश जातीवंत व शुद्ध आहेत तर 80टक्के गोवंश जाती विरहीत असल्याचे ही डाँ. ठोंबरे यांनी व्यक्ती केले. यावेळी डाँ. रुतुराज साडेगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. परिसंवादाचे सुत्रसंचलन अरुण जाधव तर आभार रामेश्वर शेरे यांनी मानले.◆पुर्व मशागतीपासुन बोंडअळीचा बंदोबस्त करा-डाँ. पी. आर. झंबर
कापसाच्या बीटी वाणात बोंडअळीमुळे शेतक-याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे. शेतक-याचे कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी गुलाबी बोंडअळीचा बंदोबस्त पुर्व मशागतीपासुनच करण्याची गरज असल्याची माहिती परभणी कृषी विद्यापिठातील डाँ. पी. आर. झंवर यांनी दिली आहे. ते कापुस पिकातील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन या परिसंवादात बोलत होते यावेळी वल्लभ लोया, डाँ. प्रताप घांडगे, मिलिंद सावंत, सोपनराव घुबे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. गुलाबी बोंडअळीमुळे 80 टक्के उत्पादन घटते म्हणुन शेतक-यांनी पुर्व मशागत करतांना 15 मार्चपुर्वी शेतातील कापुस काढुन टाकावा प-हाटीचा चुरा करावा. शेतातील कपासीचे पुर्ण अवषेश नष्ट करावेत जेणे करुन पुढील हंगामासाठी बोंडअळीचे अंडे किंवा पतंग शिल्लक राहणार नाहीत तसेच कपाशीची लागवड करतांना बि. टी. वाणासोबत आलेले नाँन बिटीचे वाण याच्या सभोवताली अश्रायात्मक ओळी लावव्यात फवारणी करतांना अंडी घालतांना म्हणजेच 55 ते 60 दिवसांनी फवारणी महत्वाची आहे. तसेच युरिया तसेच इतर द्रव्य मिसळण्याचे टाळावे. एवढेच नव्हे तर निंबोळी अर्क वापरल्यास बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार नाही असेही डाँ. झंबर म्हणाले कार्यक्रमाचो सुत्रसंचलन नाना पवार तर अभार रणजित चव्हाण यांनी मानले परिसंवादास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें