वक्तृत्व स्पर्धेत प्रतिक्षा काळे प्रथम,मंदार लटपटे द्वितीय तर सानिका देऊळगावकर तृतीय
सेलू: येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय आणि शब्दसह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने रविवार ता.२५ रोजी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वाचन कक्षात मराठी राजभाषा दिना निमित्ताने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत गांधी विद्यालय एकता नगर शाखेची विद्यार्थिनी प्रतिक्षा काळे प्रथम, सरस्वती विद्यालय गंगाखेडचा विद्यार्थी मंदार लटपटे द्वितीय तर नूतन कन्या प्रशालेची विद्यार्थिनी सानिका देऊळगावकर हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. तर यशवंत विद्यालय सेलूचा विद्यार्थी गणेश फासाटे आणि श्रीमती शांताबाई नखाते विद्यालयाची विद्यार्थीनी समीक्षा साबने यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमात २७ तारखेला पारितोषिक वितरण होणार आहे. वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यातील चोवीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उद् घाटन प्रा.डॉ.भालचंद्र धर्मापूरीकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्जेराव लहाने हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पञकार डॉ.विलास मोरे,सेलू तालूका पञकार संघाचे अध्यक्ष मोहन बोराडे, एकनाथ जाधव,किशन कटारे यांची उपस्थिती होती.श्रीराम उन्हाळे,अनिता कानडे, काशिनाथ पल्लेवाड,दिगंबर रोकडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश हिवाळे यांनी केले.तर आभार प्रदर्शन महादेव आगजाळ यांनी केले. शरद ठाकर,प्रा.अजय महाजन यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें