- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 3 फ़रवरी 2018

मानवत येथील डॉकटरांनी दिले एन.एम. सी. बिलाच्या समर्थनार्थ निवेदन.

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०३: ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने लोकसभेत सादर केलेल्या एन.एम.सी.बिल व ब्रिज कोर्स च्या समर्थनार्थ ३ फेब्रुवारी शनिवारी मानवत तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने मानवत येथील तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
  नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांना दिलेल्या निवेदनात एन. एम. सी. बिलाबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन व आभार मानण्यात आले असून, हे बिल लवकरात लवकर पास करून कायदा करावा जेणे करून सर्वसामान्य जनतेला चांगली आरोग्य सेवा ग्रामीण भागातही मिळणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर होमिओपॅथीक डॉक्टर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ सचिन कदम, तालुकाध्यक्ष डॉ योगेश तोडकरी, सचिव डॉ राजेश लाटकर, कोषाध्यक्ष डॉ सचिन चिद्रवार , डॉ राजकुमार लड्डा, डॉ संतोष खडसे, डाँ.भारत कदम, डॉ विनोद सोमाणी, डॉ दिलीप जाधव, डॉ भारत मुळे, डॉ श्याम वाघमारे, डॉ सुशील नाकोड, डॉ रतन चामलवार, डॉ विष्णू काकडे, डॉ श्रीनिवास गरुड, डॉ संतोष जाधव, डॉ राजीव जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें