बाजार समितीने दाखवली सहानुभूति
◆कर्मचारी वेतनासाठी बँकेत अनामत रक्कम जमा
सेलु(प्रतिनिधि) :बाजार समितीची आर्थिक परिस्थिति नाजुक असतांना कर्मचारी यांना वेळेवर वेतन मिळावे यासाठी बाजार समितीचे सभापती रविंद्र डासाळकर यांनी पुढाकार घेत वेतनाची रक्कम बँक खात्यामध्ये अनामत रक्कम जमा करुन कर्मचा-या प्रति सहानुभूति दाखवली आहे. बाजार समितीच्या कारभारामध्ये पारदर्शकता आणत बाजार समितीचे सभापती रविंद्र डासाळकर यांनी बाजार समितीच्या कर्मचा-यांचे मागील वेतन अदा करुन त्यांच्या चालु वेतनासाठी साईबाबा बँकेत 25 लाख रुपयाच्या अनामत ठेवी जमा केल्या आहेत अल्पावधीतच सभापती रविंद्र डासाळकर यांनी बाजार समितीचा कायापालट केला असुन मागील 17 वर्षाची मरगळ बाजुला सारली आहे. त्यांच्यासोबत बाजार समितीचे उपसभापती सुंदर गाडेकर तसेच संचालक मंडळासह बाजार समिती कर्मचा-यांचे सहकार्य लाभत आहे.साईबाबा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लाडाने यांनी मुदत ठेवीचा बाँन्ड एफ डी आर बाजार समिती सभापती रविंद्र डासाळकर यांच्याकडे सुपुर्द केला यावेळी उपसभापती सुंदर गाडेकर ,संचालक दिनकर वाघ, दामोधर दळवे, सचिव प्रकाश पौळ, राजु वाघ, सिंगणे चव्हाण, राऊत आदींची उपस्थिति होती.तसेच बाजार समितीच्यावतिने सामाजिक बांधिलकी जोपासत तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना देखील आर्थिक मदतीचा हातभार लावण्याचा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.
Tezznews24 web news channel.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें