जात, धर्म, रंगा ऐवजी देश व शेतक-यासाठी वादळ निर्माण झाले पाहिजे - आमदार बच्चू कडू - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 22 फ़रवरी 2018

जात, धर्म, रंगा ऐवजी देश व शेतक-यासाठी वादळ निर्माण झाले पाहिजे - आमदार बच्चू कडू

जात, धर्म, रंगा ऐवजी देश व शेतक-यासाठी वादळ निर्माण झाले पाहिजे -  आमदार बच्चू कडू 


सेलूत राज्य स्तरीय कृषी  प्रदर्शना चे उद्घाटन


सेलू :प्रतिनिधी

पावलो पावली स्वत: साठी  जगणारे लोक  पाहावयास मिळतात .,जाती,धर्म व रंगा साठी वादळ निर्माण होतात.त्या ऐवजी देशा साठी व शेतकऱ्यांसाठी वादळ निर्माण करण्याची गरज असून जाती सोबत नाही तर शेतकऱ्यांच्या दुःखा सोबत नात जोडण्याची भावनिक साद आमदार बच्चू कडू यांनी घातली.

ते येथील नूतन महाविद्यालयाच्या क्रीडागणावर सार्वजनिक शिवजयंती सोहळ्या निमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व छत्रपती संभाजीराजे भोसले चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित राज्य स्तरीय कृषी प्रदर्शनाशांच्या उदघाटन प्रसंगी सोमवार 19 फेब्रुवारी रोजी बोलत होते. या वेळी समारंभाचे स्वागताध्यक्ष सेलू-जिंतुर मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे   आमदार विजय भांबळे,नगराध्यक्ष विनोद बोराडे,  परभणी जि.प.च्या अध्यक्षा उज्वलाताई राठोड, जि.प. चे अर्थ व बांधकाम सभापती अशोक काकडे, जि.प. चे कृषी सभापती श्रीनिवास मुंढे,पं.स. सभापती पुरुषोत्तम पावडे, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय रोडगे, परभणी जि.प.चे गटनेते राम पाटील खरबे, संभाजी ब्रिगेड चे छगन शेरे ,राजेंद्र लहाने, सहायक जिल्हा अधिकारी राहुल कर्डीले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे , अजय चौधरी,इंद्रायणी रोडगे,हेमंतराव आढळकर,प्रभाकर सुरवसे,जयप्रकाश बियाणी, नंद किशोर बाहेती,प्राचार्य शरद कुलकर्णी, विनायक पावडे,माऊली ताठे, तहसीलदार स्वरूप कंकाळ,डॉ. सुबोध माकोडे,डॉ.संजय हारबडे, रामप्रसाद घोडके,विद्याचरण कडावकर, प्रमोद कुदळे, बालासाहेब शिंदे, प्रभाकर शिंदे,भास्करराव शिंदे, बि.एस. कोलते, गोविंद काष्टे, आदीची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी पुढे बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की चांगल्या कामात अफाट शक्ती आहे.तर समजा मध्ये शेतकरी व सर्व सामन्याचे दुःख मोठे आहे.त्यासाठी जवळून पाहण्याची गरज आहे.लोक प्रतिनिधीनी देखील जाती आणि धर्माला तिलांजली देऊन निवडणुकीतील गैर प्रकार टाळले पाहिजे .आशीर्वादा सहित मत घेता आल पाहिजे

◾छत्रपती सर्वाचे आदर्शच राहिले असते.

 छत्रपती शिवरायांच्या हातात कोणताही झेंडा असता तरी देखील ते आपल्या सगळ्यांचे आदर्श च राहिले असते. कारण कर्तृत्वावर चालणारा एकमेव जगाचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाणा मानावे लागेलं. खबरदार जर शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावाल तर असे सांगताना त्यांचे शेतकऱ्या विषयी चे प्रेम स्पष्ट होते. मात्र छत्रपतींचा आशीर्वाद मोदींना साथ असे म्हणून सत्तेवर आलेल्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता येत नाहीत .मंत्रालयात आत्महत्या होत आहेत.म्हणून जाळी लावण्याचे काम हाती घेतले आहे.जाळी लावल्याने आत्महत्या थांबतील अस वाटणाऱ्या शेतकरी  विरोधी  सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्णपणे कडेलोट केले असते.

◾चुकिच्या चालीरिती बदलण्याची गरज

मंदिर ,मज्जीद भरपूर झाले,आता गरज आहे ती चुकीच्या परंपरा चालीरीती बदलण्याची व रुग्णालय वसतिगृह उभारण्याची.येथील संभाजी ब्रिगेड च्या वतीने शेतकऱ्यांच्या मुलासाठी वसतिगृह उभारण्यासाठी संकल्पना पुढे आणली यासाठी उभयतांना  मनाचा

मुजरा. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या डोक्यात जो पर्यंत चांगले दिन येणार नाहीत तोपर्यंत सरकारची अच्छे दिनाची कल्पना पूर्ण होणार नाही. 70 वर्षात साधी शिक्षणाची व्यवस्था झाली नाही.त्यामुळे या पुढे चांगले रुग्णालय व चांगले वस्तीगृह बांधण्याची गरज आहे.

@ शेतकरी वडीलाची  मेहनत मोजा

आजचा तरुण सचिन तेंडुलकरने काढलेल्या धावा मोजतो,मात्र आपल्या शेतकरी वडिलांची मेहनत मोजत नाही.जाती आणि धर्माच्या नावाने भांडण्या पेक्षा शेतकऱ्यांच्या नावाने पेटून उठा. आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या.साडे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचे कुणालाच सोयर सुतक नाही .आपण इंग्रजांच्या जबड्यातुन सुटून जाती पातीच्या जबड्यात अडकलो आहोत.जाती धर्मा पेक्षा शेतकऱ्यांसाठी लढाई करा.कारण शेतकऱ्यांचे प्रश्न मिटले तर जातीचे प्रश्न शिल्लक राहणार नाहीत. शेत मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाल्यास आत्महत्या होणार नाहीत.ही लढाई भारत आणि इंडिया ,गाव आणि शहर अशी झाली पाहिजे.यातील फरका चे भेद कायमचे मिटवण्यासाठी भांडा.

◾स्वामिनाथन आयोगाचे काय

सण 2006 पासून स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे प्रयत्न सुरू असताना शेतकऱयांच्या हिताचा हा आयोग  सरकारने एकदा ही लागू केला नाही. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढून देणारे सात आयोग लागू झाले.एकेकाळी सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन प्ररितोला सोने, व प्रति किवीनंतल कापूस याचे मूल्य समान होते. आजची तफावत बगता या साठी पेटून उठण्याची गरज आहे.मात्र कुठे पेटावे हे कळत नाही.जो पर्यंत राजकारनातील शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे चांगले दिवस येत नाही असे ही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व चूल पेटवून संभारभ उद्धाटन करण्यात आले. शिंदे व संच यांनी जिजाऊ वंदना व पाळणा गीत सादर केले.तसेच गोविंद काष्टे ,व गोविंदराव ताठे याना समाज भूषण तर ओमप्रकाश चव्हाळ,विनायक गोरे, मधुकर घुगे, विठ्ठल गिराम, राधेश्याम कुडे आदींना बळीराजा कृषिभूषण पुरस्कार देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामराव बोबडे यांनी केले तर रामराव गायकवाड यांनी आभार मानले.

◾नवीन तंत्रज्ञानाची गरज - आमदार विजय भांबळे

कृषिप्रदान भारत देशात वातावरण व निसर्ग बदलला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतीत नवीन तंत्रज्ञानाची गरज असून ते तंत्रज्ञान पाहण्यासाठी म्हणून कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका स्थरावरील राज्यस्तरीय कृषी प्रधारशनक्सच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजकांना धन्यवाद देतो असेही आमदार विजय भांबळे यांनी स्पष्ट केले.तसेच नियोजित बळीराजा वसतिगृहा साठी आमदार विजय भांबळे यांनी 25 लाख, नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी 5 लाख ,सभापती अशोक काकडे यांनी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली तर डॉ संजय रोडगे यांनी श्रीराम प्रतिष्टानच्या विविध शैक्षणिक संकुलात प्रवेश घेणाऱ्या शेतक-यांच्या मुलांसाठी 25%  आर्थिक शैक्षणिक सुट  देण्याचे जाहीर केले तर सहायक जिल्हा अधिकारी  राहूल कर्डीले यांनी शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तसेच शेत तळे मंजुरी साठी नोंदणी केल्यास तात्काळ मंजुरी देण्याचे जाहीर केले.

◾सामाजिक उपक्रमास प्राधान्य -छगन शेरे

शिवजन्मोत्सव सोहळ्यातील मिरवणुकी वरील खर्च टाळून या पूर्वी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. या वर्षी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले. तालुकास्थरावर राज्यस्थरिय कृषी प्रदर्शन आयोजित करताना अनेक अडचणी वर मात करावी लागली.मात्र काम करत असताना समाजिक उपक्रमलाच प्राधान्य देनार असल्याचे संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे यांनी दिले आहे.तसेच लवकरच शेतकऱ्यांच्या मुलांसाठी बळीराजा वस्थीगृह उभारून मोफत निवास व भोजनाची व्यवस्था करणार अशी माहिती छगन शेरे यांनी दिली.


फोटो : शंभू काकडे सेलू

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें