मा. आमदार बच्चूभाऊ कडू यांची प्रिन्स अकॅडमी सी.बी.एस.ई स्कुलला सदिच्छा भेट......
सेलु:- येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स अकॅडमी सी.बी.एस.ई स्कुलला (निवासी शाळा) मा. आमदार बच्चूभाऊ कडू यांनी (ता.19) वार सोमवार रोजी भेट दिली. यावेळी सेलु-जिंतुर विधानसभा सदस्य मा. आमदार विजयरावजी भांबळे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगनदादा शेरे, संस्थेचे अध्यक्ष डाॅ. संजय रोडगे, शिवलिंग बोंधने,प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्रा अशोक बोडखे आदी उपस्थित होते.शाळेतील अद्यावत सुविधा, विविध साॅफ्टवेअरचा अध्यापनात वापर, सायन्स प्रात्यक्षिक हाताळणीची सोपी पद्धत, प्रशस्त इमारत, उत्तम निवास व भोजन व्यवस्था तसेच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन स्थळी घटक संस्थेतील शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये प्रवेश घेतला तर शैक्षणिक फीस मध्ये 25% सवलत देण्याच्या निर्णयाचे कौतुक केले.ते म्हणाले की, शेतकरी मुलगा शिकला पाहिजे.
यावेळी शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें