भोकरदन तालुक्यात बाल मजुरांची संख्या वाढलेली मात्र उपाय योजना कागदावर - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 9 फ़रवरी 2018

भोकरदन तालुक्यात बाल मजुरांची संख्या वाढलेली मात्र उपाय योजना कागदावर

भोकरदन तालुक्यात बाल मजुरांची संख्या वाढलेली मात्र उपाय योजना कागदावर

या बाल कामगारांना  कसलीही शाळा नाही यांच्या गरीबीचा फायदा बघता दुकानदार दिवस-रात्र काम करुण घेतात

अनेक वेळा सर्वे करुण सुद्धा कारवाई होत नाही

भोकरदन प्रतिनिधी :(शेख सलिम)
तालुक्यात दिवसोंदिवस बाल मजूरांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत असलीतरी ते मात्र कागदावरच आहे पुढील उपाय तातडीने होत नसल्याने बाल कामगार सुधारणेसाठी तालुक्यात कोणत्याही प्रकारची हालचाली सुरू नसल्यामुळे विविध क्षेत्रात सध्या बालकामगार देखील गुंतलेले असल्याचे चित्र आहे ही बाब अत्यंत खेदजनक आहे मात्र या साठी तालुक्यात प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे देश स्वतंत्र झाला असला तरी बालकामगार कधी स्वंतत्र होणार असा सवाल समाज सेवक तथा राष्ट्रवादीचे नगरसेवक अब्दुल कदीर बापु यांनी या वेळी उपस्थित करून फार चिंता व्यक्त केली आहे मोहत्वाचे म्हणजे शहरातील अनेक व्यवसाय सुरू असुन यात बालकामगार गुंतलेले असल्याचे दिसुन येत आहे या साठी शहरातील हाॅटेल चुनकचरा तसेच अनेक मुले चुकीच्या मार्गाने जात आहे आणी प्रशासन नुसते कागदी घोडे नाचवत असल्याने नागरीकांत संतापाची लाट पसरत आहे  या साठी भारतीय संविधानात  कठोर कायदेची तरतुद करण्यात आली असुन जो कोणी बालकामगार आपल्या व्यवसायांत ठेवणार तर अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल विषेश म्हणजे साधारणतः चौदा वर्षांखालील वयाची मुले. ज्या व्यवसायांत कौशल्याची वा विशेष प्रावीण्याची गरज नसते, अशा हलक्या कामांत बालकामगार गुंतलेले दिसतात मोहत्वाचे म्हणजे या पुर्वी तालुक्यात अनेक वेळासर्वेक्षण करण्यात आले होते त्यानुसार बालकामगारांची संख्या अधिक असल्याचे समोर आले होते मात्र अशा बालकांना शाळेची व्यवस्था करणे तसेच अनेक समस्यावर तोडगा काढण्यासाठी ताबडतोब हालचाली करण्यात आली पाहीजे नुसते सर्वे करून चालणार नाही कारण शहरात चुन कचरा आणी विविध व्यवसायात तसेच दुकानात हाॅटेल आणी कापुस जिनिंग आदी क्षेत्रात बालकामगार गुंतलेले दिसतात व  शहरात अशिपण  चर्चा आहे की काही दुकानदार बाहेरुण लाहान मुले कामासाथी आंतात व त्यांच्या आई वडिलांकडून  बॉन्ड करुण घेतात व या बाल मुलांन साठी अनेक समाज सेवकांनी पुढकार घेतला असलातरी मात्र प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवत असल्याचे बोलले जात आहे तरी प्रशासनाने योग्य ते पावले उचलावीत व योग्य ती करवाई करावी अशी मागणी नगर सेवक अब्दुल कदीर बापु यांनी केली आहे.

Tezznews24 web news channel

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें