राज्य वरीष्ठ टेनिस व्हाँलीबाँल स्पर्धेत सोलापूर विजेता तर परभणी व उपनगर मुंबई उपविजेता - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 13 फ़रवरी 2018

राज्य वरीष्ठ टेनिस व्हाँलीबाँल स्पर्धेत सोलापूर विजेता तर परभणी व उपनगर मुंबई उपविजेता

*राज्य वरीष्ठ टेनिस व्हाँलीबाँल स्पर्धेत  सोलापूर विजेता तर परभणी व उपनगर मुंबई  उपविजेता* 


सोलापूर =टेनिस व्हाँलीबाँल महाराष्ट्र असोसिएशन व सोलापूर शहर  टेनिस व्हाँलीबाँल असोसिएशन च्या वतीने आयोजित 19 वी राज्य टेनिस व्हाँलीबाँल स्पर्धेत दि.11 ते 13 फेब्रुवारी दरम्यान,  पुरुष व महिला गटात सोलापूर जिल्हा तर पुरुष परभणी व महिला गटात उपनगर मुंबई उपविजेता ठरला.
पुरुष गटात  उपांत्य फेरीत सोलापूर संघाने उपनगर मुंबई चा 2-1  सेट मध्ये पराभव करत अंतिम फेरीत तर परभणी संघाने मुंबई शहर संघाचा 2:0 सेट मध्ये पराभव  करत अंतिम फेरीत सोलापूर संघा सोबत कडवी झुंज देत 1-2 सेट ने सोलापूर विजेता तर परभणी उपविजेता ठरला.तर तिसऱ्या स्थानावर उपनगर मुंबई.
महिला गटात उपांत्य फेरीत सोलापूर संघाने नाशिक संघाचा 2:0 सेट ने पराभव करत अंतिम फेरीत उपनगर मुंबई चा 2:0 सेट मध्ये पराभव करून , सोलापूर विजेता तर उपनगर मुंबई उपविजेता ठरला. तिसऱ्या स्थानावर नाशिक.
मिश्र दुहेरी स्पर्धेत प्रथम - सांगली, व्दितीय - सोलापूर, तिसऱ्या - नाशिक. संघ राहीला.
बक्षीस वितरण सोहळ्यास मनपा बालकल्याण सभापती श्रीमती अश्विनी चव्हाण, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी टेनिस व्हाँलीबाँल जनक डॉ. व्यंकटेश वांगवांड, तर राज्य सचिव आंनद खरे, राज्य उपाध्यक्ष नंदकुमार देशंपांडे, राज्य सहसचिव गणेश माळवे,प्रा.दिनेश सिंगाराम, जिल्हा अध्यक्ष कार्तिक चव्हाण, सचिव संतोष खेंडे , रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विजयी व उपविजयी संघास चषक प्रदान  करण्यात आले
स्पर्धा पंचप्रमुख प्रफुल्ल बन्सोड, डॉ. दशरथ देसिंगे, गजानन शिंदे, गणेश पाटील, किरण घोलप, स्वाती बेने, गणेश कलंगुल , रवींद्र चव्हाण , इकबाल सर, शेख वासिम  यांनी काम पाहिले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें