मा ना चंद्रकांत दादा पाटीलमहसुल मंत्री महाराष्ट्र राज्य यांनीदिली *करण भाऊ गायकर* यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट...!! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 13 फ़रवरी 2018

मा ना चंद्रकांत दादा पाटीलमहसुल मंत्री महाराष्ट्र राज्य यांनीदिली *करण भाऊ गायकर* यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट...!!

मा ना चंद्रकांत दादा पाटीलमहसुल मंत्री महाराष्ट्र राज्य यांनीदिली *करण भाऊ गायकर* यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट...!!


काल दि १२ फेब्रुवारी २०१८ सोमवार रोजी
महसुल मंत्री
मा श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी
छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष
करण भाऊ गायकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी गायकर कुटुंबीयांच्या वतीने दादांचे औक्षण व पुष्पगुच्छ  देवून स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार अपुर्व हिरे, सुनील भाऊ बागुल, गणेश भाऊ कदम,रोशन भाऊ घाटे, बाळासाहेब लांबे,शिवा तेलंग,नितिन सातपुते, विश्वनाथ वाघ, ज्ञानेश्वर थोरात, तुषार जगताप, राहुल काळे,विजय खर्जूल, नवनाथ शिंदे,अविनाश गायकर,किरण बोरसे,विनायक वाघमारे आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सदर भेटी दरम्यान महाराष्ट्र राज्यातील शेतकरी,कष्टकरी,कामगार,विद्यार्थी यांच्या असलेल्या समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चेत *करणजी गायकर* यांनी
सामान्य जनतेची बाजु मांडत विविध विषय दादां समोर सादर केले.
त्यामध्ये समृदधी महामार्ग तयार करत असताना शेतकर्यांच्या जमिनीचा मोबदला हा चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित करण्यात आला आहे.
मोजनी करत असताना सुपिक जमिनीला देखील कोरडवाहू जमीन दाखवून चुकीच्या पद्धतीने मोजमाप झाल्याचे नमूद करण्यात आले.
तसेच राज्य शासनातर्फे चालवल्या जाणाऱ्या
आण्णासाहेब पाटिल महामंडळ व सार्थी सारख्या योजनांचे कार्यालय नाशिक मध्ये व्हावे अशी मागणी करण्यात आली.
तसेच मराठा आरक्षण व मराठा विद्यार्थी वसतिगृह हा देखील मुद्दा आग्रहीपणे मांडण्यात आला.
मराठा क्रांति मोर्चा दरम्यान नाशिक जिल्ह्यातील शेकडो तरुणांवर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते सदर गुन्हे राज्य सरकार हे मागे घेणार असल्याचे आश्वासन मा मुख्यमंत्री यांनी दिले होते परंतु आज सदर गुन्हे हे बोर्डावर आलेले असताना देखील सरकार तर्फे कुठलाही गुन्हा हा मागे घेण्यात आलेला नाही तेव्हा स्वतः दादांनी याकडे वैयक्तिक लक्ष्य द्यावे अशी मागणी करण्यात आली.
तसेच राज्यशासना तर्फे विविध योजना ह्या जाहिर केल्या असून सदर योजना ह्या आजमितिला सामान्य जनतेपर्यंत योग्यरित्या पोहचल्यानसून त्याची नोंद घेवून योग्यरीतीने सादरीकरण होणे गरजेचे आहे
तेव्हा प्रशासकीय अधिकारी यांना जाब विचारुण त्याची योग्यरीतीने अमलबजवनी करावी हे देखील नमूद करण्यात आले.
तसेच नाशिक जिल्हा शिवजन्मोत्सव समितिच्या वतीने
बोलताना *आमदार अपुर्व हिरे व सुनील भाऊ बागुल* यांनी १९ फेब्रुवारी २०१८ रोजी साजरा करण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित एक जिल्हा एक जयंती या कार्यक्रमाची रूपरेषा समजवुन सांगत संपूर्ण नियोजन विस्तारित स्वरुपात मांडण्यात आले.
तसेच ग्रामपंचायत महिरवणी उपसरपंच रमेश खांडबहाले, ग्रामपंचायत गिरणारे सरपंच तानाजी गायकर व ग्रामपंचायत बैळगांव ढगा सरपंच दत्तू भाऊ ढगे यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या जमिनीतिल पोटखराबा विषया संदर्भातील निवेदन दादांना देण्यात आले.
तसेच मराठा क्रांतिमोर्चा दरम्यान विविध सामाजिक संघटना ना या एकजुटीने एकत्रित येवून काम करत होत्या त्या अनुषंगाने राज्य सरकारने जाहिर केलेल्या सर्व शासकीय योजनांचे जीआर हे शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत व मराठा क्रांतिमोर्चात सहभागी विवध संघटना च्या साथीने महाराष्ट्रातील सामान्य जनतेपर्यंत थेट पोहचवता येवू शकतात हे देखील सुचवण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें