सिल्लोड तालुक्यातील पुर्णा नदीपात्रात वाळुमाफियांचा हैदोस - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 8 फ़रवरी 2018

सिल्लोड तालुक्यातील पुर्णा नदीपात्रात वाळुमाफियांचा हैदोस

सिल्लोड तालुक्यातील पुर्णा नदीपात्रात वाळुमाफियांचा हैदोस

सिल्लोड /अजय बाेराडे
एकिकडे पाणी ही समस्या असून त्यासाठी उपाय योजना न करता पुर्णा नदी पात्रातुन अवैधरित्या वाळू उपसा जोरात चालू आहे. मात्र महसूल अधिकारी व पोलीस प्रशासन याकडे डोळेझाक करताना दिसून येत आहे.

सिल्लोड तालूक्यातील पुर्णा नदीपात्र हा खूप मोठे आहे तालुक्यातील बोरगाव बाजार, सिसारखेडा, वांजोळा, खोडकाई, भवन, पिपंळगाव पेठ, बोरगाव कासार, ताडांबाजार, हे गावे आहेत.मात्र, या गावानी या नदिपात्राची देखभाल करायला पाहिजे तर याउलट

पिपंळगाव पेठ, बोरगाव कासारी, भवन या गावातून टेंडर चालू नसताना २४ तास वाळू उपसा हा चालू आहे. या पुर्णा नदी पात्राच दिवसेंदिवस वाळवंट होत चालल आहे. नदी पात्रात जागोजागी २०-२० फूट खड्डे पडले आहे.

यामुळे पाण्याची पातळी खूप कमी झाली असून पिण्याच्या पाण्याची समस्या वाढत चालली आहे. जागोजागी वाळू साठे केले असून नदीपात्रात दिवसा वाळू उपसा चालू आहे. तरी पण फक्त नुसता कारवाई चा बडगा असून नावा पुरती कारवाई होते.पुन्हा जैसे थे अशी परिस्थिती आहे. रोजचे 7ते 8 ट्रक्टर व 4 हायवा गाड्या भरधाव वेगाने जातात हे सर्व पोलीस व महसूल प्रशासनाच्या आशिर्वादाने चालत आहे.

 याकडे जिल्हा प्रशासकिय अधिकारी सुद्धा डोळेझाक करत आहेत. यामुळे जमा होणारा सर्व महसूल सरकारला जमा न होता तो पोलीस व महसूल अधिकाऱ्यांच्या घशात जातो. पोलीस प्रशासनाने रात्री गावोगावी गस्त घालण्याऐवजी ते रात्रभर फक्त वाळू माफीया कडून हफ्ता वसूल करण्यासाठी फिरत असतात.

*वाळू माफीयांचं सी.आय.डी.लोकेशन
कोणता अधिकारी कूठ आहे,कुठून येतोय याची सर्व माहिती लोकेशन बहाद्दरांना असते प्रशासना पेक्षा जास्त बंदोबस्त हा वाळू माफीयाचा आहे. वाळू माफीयाचे बोलेरो,स्विफ्ट या कार मधून होते लोकेशन यामुळे महसूल अधिकारी आले तर त्याच्या हाताला फक्त तूरीच मिळतात. यामुळे वाळू माफीयाना कोणत्याही अधिकाऱ्यांचे भय राहीले नाही. त्याचबरोबर वाळू एजंटचा सूळसूळाट वाढला असून
सिल्लोड येथील वाळू माफिया एजंट द्वारे हायवा भरून घेऊन जातात.

एजंट कडून पोलीसांना प्रत्येक गाडीचा रोज हफ्ता मिळतो. एस.एम.एस. द्वारे गाडी नंबर पाठवून हफ्ता दिला जातो. याप्रकारे हा अवैध वाळू उपसा सुरु आहे. पोलीस वाळू माफीयावर थातूर मातूर गुन्हा नोंद करून सोडून दिले जाते मात्र ठोस अशी कारवाई काही होत नाही. महसूल व पोलीस प्रशासन वाळू माफीया पुढे हतबल झाले का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

*वाळू पासुन झाली ही अवस्था...
फार पूर्वी वाहतुकीची साधने अत्यल्प होती. वाळूउपश्याला आवश्यक साधने सहजासहजी उपलब्ध होत नसत. त्यावेळेस पर्याय म्हणुन मजुरांद्वारे वाळूउपसा केला जाई. वाळूउपसा मजुरांचा जगण्याचे नवे साधन झाले होते. वाळू हे पैसे छपाईचे नवे यंत्र गवसले होते. पैसा आल्याने सुबत्ता वाढू लागली दारोदारी आलीशान चारचाकी गाड्या, बंगले दिसू लागले. काढलेली वाळू शहरात जाऊन विकायची. त्यातून रग्गड पैसा मिळू लागला. कमी श्रमात दुप्पट तिप्पट पैसा मिळु लागल्याने वाळूचे अर्थकारण समजू लागले. काहींनी याच धंद्यातून ट्रॅक्टर, ट्रक, आदी वाहने घेउन या व्यवसायात प्रवेश केला. तरूणांचा ओढा वाढू लागला. पैशाचा हव्यास वाढू लागल्याने हायटेक चा वापर करत जेसीबी, पोकलेन आदी आधुनिक मशीनरींचा वापर करत जोरदार वाळू उपसा होऊ लागला बक्कळ पैसा मिळू लागल्याने काहींनी हॉटेल, ढाबे, वेगवेगळे जोडधंदे सुरू केले. काहींनी सफेदपोश राजकारणात प्रवेश राजकारणात प्रवेश केला. पैसा आल्याने अनेक जुगार, मटका आदी व्यसनांची शिकार झाले. यातच अनेक कुटुंब उध्वस्त झाली. ज्यांनी व्यवसाय थाटले ते प्रगती करत गेले, ज्यांनी व्यसनाचा मार्ग स्वीकारला ते उध्वस्त झाले तर ज्यांनी राजकारणाचा रस्ता धरला ते पुढारी होऊन गेले.
या प्रकरणी महसुल प्रशासनाने लक्ष देऊन वाळु माफियांवर कडक कार्यवाहि करावी आशी मागनी जनतेतुन केली जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें