मानवत शहरातील अनाधिकृत महा ई सेवा केंद्र चालकावर कारवाई करण्याची मागणी .
[] अधिकृत महा ई सेवा संघटनेच्या वतीने तहसिलदारांना निवेदन []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१६: मानवत शहरात बऱ्यांच दिवसापासून अनाधिकृत महा ई सेवा केंद्र व आधार किट मल्टि सर्व्हिससच्या नावा खाली चालु आसुन या सदर्भात अधिकृत महा ई सेवा संघटनेच्या वतीने अनाधिकृत महा ई सेवा केंद्र चालकांना वारंवार तोडि सागुनहि उडवा उडवीचे उत्तर देत असल्यामुळे अधिकृत महा ई सेवा संघटनेच्या वतीने तहसिलदार आश्विनी जाधव यांना निवेदन देउन कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, शहरातील नगरपरिषद जवळील अनाधिकृत महा ई सेवा केंद्र चालक संदिप निलवर्ण हा गेले दोन वर्षापासून अनाधिकृत महा ई सेवा केंद्र चालवत आहे त्याचा महा ई सेवा केद्राचा परवाना हा मंगरूळ गावचा आहे तसेच शहरातील अठवडी बाजारात दुसरे अनाधिकृत रामा घाटूल हे जाधव मल्टि सर्व्हिसेस आधार किट चालवत आहे या दोन्ही अनाधिकृत महा ई सेवा केद्रावर तात्काळ कारवाई करून बंद करण्यात यावे आसे निवेदन शहरातील अधिकृत महा ई सेवा केंद्र चालकानी दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सकाळी मानवत तहसिल येथे तहसिलदार आश्विनी जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर अधिकृत महा ई सेवा केंद्र चालक गोविंद घांडगे , काकडे सर ,विनोद ढालकरी यांच्या स्वाक्षरी आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें