औरंगाबाद येथे मेट्रो रेल्वे सुरु करा : खासदार चंद्रकांत खैरे यांची लोकसभेत मागणी - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 8 फ़रवरी 2018

औरंगाबाद येथे मेट्रो रेल्वे सुरु करा : खासदार चंद्रकांत खैरे यांची लोकसभेत मागणी

 औरंगाबाद येथे मेट्रो रेल्वे सुरु करा : खासदार चंद्रकांत खैरे यांची लोकसभेत मागणी

नव उदयोजक व पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन लवकरच निर्णय घेण्याची आग्रही मागणी.

ईमरान खान.
प्रतिनिधि.औरंगाबाद.
औरंगाबाद ता. ७ दिल्ली - मुंबई इंडस्ट्रियल  कोरीडर, पर्यटन केंद्र , मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगर शहरात मेट्रो रेल्वे सुरु करण्याची आग्रही मागणी शिवसेना नेते तथा  खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत नियम ३७७  काळात मागणी केली.
        अजिंठा - वेरूळ  लेणी, बिबिका मकबरा, शहरातून साई बाबा शिर्डी , शनी शिंगणापूर (शनिदेव महाराज )
आदींसह प्रमुख धार्मिक स्थळांसाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सुरळीत व्हावी, मुंबई इंडस्ट्रियल  कोरीडर, पर्यटन केंद्र  येथे जाण्यायेण्यासाठी दळणवळण व्यवस्था मुबलक राहण्यासाठी मेट्रो रेल आवश्यक असल्याचे शिवसेना नेते तथा  खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत सांगितले.
लवकरच केंद्र सरकार याबाबत सर्वेक्षण करणार असल्याचे  व त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद शासनाकडून माहिती देण्यात आली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें