- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 4 फ़रवरी 2018

सोमवारी मंत्रालयात लोकशाही दिन

नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलद गतीने व्हावा यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 5 फेब्रुवारी 2018 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील शासकीय, निम-शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संदर्भात मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत अशा अर्जदारांनी  दि. 5 रोजी सकाळी 11 वाजता संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्षात उपस्थित रहावे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील अर्जदारांना मंत्रालय लोकशाही दिनात मुख्यमंत्री महोदयांसमक्ष निवेदन करण्याकरिता मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे, असे सामान्य प्रशासन‍ विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
Tezznews24 web news channel.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें