*कुंडी जिल्हा परिषद शाळेत दोन वर्ग खोल्यांचे भूमिपूजन*
समशेर खान
सेलु (वार्ताहर )
सेलू तालुक्यातील
कुंडी जिल्हा परिषद शाळेत 2 वर्ग खोल्यांचे भूमिपूजन आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते 2 फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ भावनाताई नखाते ,बांधकाम सभापती अशोकराव काकडे ,जि.प.सदस्य राजेंद्र लहाने ,अँड बालासाहेब रोडगे ,कृउबास चे माजी सभापती
दत्तराव मोगल ,गट विकास अधिकारी डि.एस आहीरे ,गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे, ,रा काँ चे तालूकाध्यक्ष माउली ताठे, राकाँचे कार्याध्यक्ष सुधाकर रोकडे ,केंद्रप्रमुख गोरगीळे ,रामराव बोबडे ,सरपंच कैलास मोगल मुख्याध्यापक श्रीमती अनुराधा गोरे यांची उपस्थिती होती.
या शाळेला सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या दोन वर्ग खोल्यांचे भूमीपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक अनुराधा गोरे यांनी केले तर सुत्रसंचालन सुमिता सबनीस (पाठक) यांनी केले तर उमा मिश्रा यांनी आभार मानले .
यशस्वीतेसाठी शाळा समिती अध्यक्ष गजानन मोगल ,के सी अंबेकर ,ए.सी कालवाने ,आर जी भाले यांनी परीश्रम घेतले.
*विद्यार्थ्यांनी ध्येयवादी बनावे -आ.भांबळे*
ग्रामीण भागात भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होण्याचे ध्येय अंगी ठेवावे .कठोर परीश्रम केल्यास यश हे निश्चित मिळते ग्रामीण भागातील जिल्हा परीषद शाळेत गुणवत्ता पुर्ण शिक्षणासाठी शिक्षकांनी ही परीश्रम घेणयाची गरज आहे .विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासामध्ये पालकांची भुमिका हि महत्वाची आहे असे प्रतिपादन आमदार विजय भांबळे यांनी केले.
*आश्वासनाची परीपुर्ती....सौ भावनाताई नखाते*
मि जिल्हा परीषद शिक्षण विभागाचा पदभार घेतल्यानंतर प्रथमच कुंडी प्रशालेला भेट दिली .यावेळी शाँर्टसर्कीट ने शाळेच्या वर्ग खोल्यासह संगणक खोलीतील साहित्य जळाले होते. हि शाळा दिसण्याने नाही तर गुणवत्तेने सुंदर असल्याने या शाळेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी मि आश्वासन दिले होते .सर्व शिक्षा अभियान मध्ये विशेष बाब म्हणून याठिकाणी दोन वर्ग खोली मंजूर करुन ते आश्वासन प्राधान्याने मि आज पुर्ण केले आहे. भौतिक सुविधासह ईतर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण विभाग सदैव तयार आहे .परंतु शिक्षकांनी मात्र विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये कुठेही कमी पडता कामा नये असे जि.प.उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ भावनाताई नखाते यांनी यावेळी बोलताना सांगितले.
*आनंददायी शिक्षण असावे...काकडे*
जिल्हा परीषद शाळेत शिक्षकांनी आनंददायी शिक्षण पध्दतीचा आवलंब केला पाहिजे .शाळेच्या वेळेतच शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिध्द केली पाहिजेत असे बांधकाम सभापती अशोकराव काकडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें