*सेलूत क्रीडा शिक्षकांच्या जिल्हा व्हाँलीबाँल स्पर्धेत परभणी मनपा विजेता तर सेलू तालुका उपविजेता*
सेलू (समशेर खान ) महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ जिल्हा शाखा परभणी व सेलू ता.शा.शि.शि. संघटना यांच्या वतीने शारीरिक शिक्षण दिना निमित्त जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक व्हाँलीबाँल स्पर्धाचे आयोजन
दि. 1फेब्रुवारी रोजी स.11 वा नूतन विद्यालय क्रीडागंण.येथे करण्यात आले .
या कार्यक्रम चे अध्यक्ष उपमुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, उद्घाटक नगराध्यक्ष विनोद बोराडे,प्रमुख पाहुणे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, पत्रकार श्रीपाद कुलकर्णी, व्हिजन इग्लिंश स्कुल अध्यक्ष संतोष कुलकर्णी,गिरिष लोडाया,जिल्हाध्यक्ष रणजीत काकडे, कार्याध्यक्ष तूकाराम शेळके, सचिव कैलास माने,मुख्याध्यापक सी.टी.नावाडे, सर्जेराव लहाने,सौ.शोभा चाटे, देशपांडे, राजेश शहाणे व सेलु तालुका अध्यक्ष गणेश माळवे,सचिव नागेश कान्हेकर यादी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी विनोद बोराडे म्हणाले क्रीडा शिक्षकांची कार्या क्षमता हि त्यांच्या विकासावरून सिध्द होते, परंतु आज या स्पर्धेतून क्रीडा शिक्षकांची स्वतः ची क्षमता आणि क्रीडा कौशल्य पाहण्यास मिळणार आहे,पण या ठिकाणी आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धो हा चांगला उपक्रम आहे,.महसूल, कोषागार, पोलीस दलातील स्पर्धा घेणाऱ्या क्रीडा शिक्षकांच्या स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी होत आहे हे ही बाब कौतुकास्पद आहे असे उद्गार काढले.
जिल्हा सेवा गौरव क्रीडा पूरस्कारहा जवाहार विद्यालय जिंतुर शाळेचे क्रीडा शिक्षक लोभाजी गायकवाड , जिल्हा क्रीडा संघटक पुरस्कार प्राप्त राजेश शहाणे, उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार महेश काळदाते, शालेय राष्ट्रीय खेळाडू तेजस फाटे, कु, पुजा उगले, निलेश माळवे, अपुर्व कुलकर्णी, मानव माने, कु. आर्ची चव्हाण, माधवी लंगुटे, ओंकार आदमाणे , संजय झाकणे, अंकुश राठोड, यांचा सत्कारा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक रणजित काकडे, सुत्रसंचालन किशोर ढोके, प्रा.नागेश कान्हेकर, तर आभार डी.डी.सोन्नेकर, यांनी मानले.
स्पर्धेत जिल्हातील 10 तालुक्याचे संघ सहभागी होते.
परभणी मनपा संघानी मानवत, सोनपेठ संघाचा पराभव करत अंतिम फेरीत दाखल झाला तर सेलू तालुका नी पालम, पाथरी, जिंतूर संघाचा परभव करत अंतिम फेरीत दाखल होऊन परभणी मनपा संघा सोबत पराभूत झाला ,या स्पर्धेत परभणी विजेता , तर सेलू उपविजेता ठरला, या संघास 1500/- व 1000/- रू रोख बक्षीस व चषक देण्यात आले आहे .
बक्षीस वितरण सोहळ्यास नूतन विद्यालय मुख्याध्यापक के.व्ही. वाघमारे, सुनील गायकवाड, प्रा. अशोक पाठक , गोपीनाथ मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी संघाची भोजन व्यवस्था सेलु तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना वतीने करण्यात आली. स्पर्धा यशस्वीतेसाठी सेलु तालुका संघटनेचे पदाधिकारी सतिश नावाडे,डी.डी. सोन्नेकर, दिलीप सुरवसे, राजेभाऊ चव्हाण, महादेव खरात, प्रशांत नाईक, जुलाह खुदूस, संतोष शिंदे,सय्यद नोमान, खराटे, पद्मपल्ले ,शेख फारूखी यांनी परिश्रम घेतले.
शुक्रवार, 2 फ़रवरी 2018
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें