Tezznews24 - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 4 जनवरी 2018

Tezznews24

तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत बरांजळा लोखंडे संघ विजयी

शेख सलिम
प्रतिनिधी- भोकरदन तालुक्यात
दिनांक 2 जानेवारी रोजी तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये लहान गट १ते५ मध्ये जि प प्रा शा बरांजळा लोखंडे शाळेचा संघ विजयी झाला. यामध्ये सार्थक लोखंडे, चैतन्य पळसकर, निता भुतेकर, कोमल लोखंडे,पुजा जावळे, या मुलांनी सहभाग घेतला. विजयी गटाला शिक्षण विस्तार अधिकारी उमेश जैन,प.समिती सदस्य प्रकाश पवार,कन्या शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एन.घायाळ यांनी शालेय साहित्य मुलांना भेट देऊन सत्कार केला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी.डी. सोळुंके,सहशिक्षक आशिष भोवते,गजेंद्र येवले,एस.ए. वाघ,ए.जी.इंगळे,ए.पी. कुलकर्णी, संजय लोखंडे,पालक अनिल भुतेकर ,नारायण लोखंडे, समाधान लोखंडे आदी गावकऱ्यांनी अभिनंदन केले.शाळेचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे.हा कार्यक्रम गटशिक्षणाधिकारी कार्यालय भोकरदन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.यामध्ये चार गट सामील झाले होते.या अगोदर पण बरांजळा लोखंडे येथील जि परिषद प्राथमिक शाळेने जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता.
तसेच त्यांनी या स्पर्धेतून बाजी मारून पुन्हा तालुकास्तरावर प्रश्नमंजुषा स्पर्धेत मजल मारलेली आहे.

Tezznews24 web news channel

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें