- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 4 जनवरी 2018

> आरोपीना अटक करा पद्मवंशिय तेली समाजाची मागणी तहसिलदाराना दिले निवेदन

अजय बोराडे.
> सिल्लोड[[]] सिल्लोड शहरातील ईदगाह परीसरात 23 डिसेबंर रोजी अवैध कत्तलखान्यावर पोलिसानी धाड टाकुन 1 कोटी 76 लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त केला होता. जप्त करण्यात आलेल्या एकशेवीस जनावरे सिल्लोड तालुक्यातील चिचंखेडा येथील अमोल ढाकरे याच्या गोशाळेत ठेवण्यात आले आहे. रविवार रोजी सायंकाळी चेहर्यावर कपडा बाधलेल्या दोन अद्य्न्यात दोन व्यक्तीनी अमोल ढाकरे याच्यावर जीवघेना हल्ला केला. या हल्ल्या प्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन संबधित आरोपी फरार झाले असुन त्याना अद्याप पर्यत अटक झालेली नाही. या संदर्भात पंद्मवंशीय तेली समाजा सिल्लोड तालुक्याच्यावतीने संघटनेचे प्रदेशअध्यक्श प्रदिप ढाकरे याच्या नेतत्वाखाली गुरूवार रोजी संबधित आरोपीना तात्काळ अटक करून कडक कार्यवाई करण्यात यावी तसेच अमोल ढाकरे याना पोलिस संरक्शन देण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसिलदार संतोष गोरड याना देण्यात आले आहे शासनाने निवेदनाची दखल त्वरीत न घेतल्यास पद्मवंशिय तेली समाजाचा वतीने राज्यभरात तीव्र आदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
>       या निवेदनावर प्रदेशअध्यक्श प्रदिप ढाकरे, आनंदा माहोर, विजय माहोर, डाँ. गणेश दसरे, दिलीप झलवार, डाँ.आर.एन. झलवार, डाँ मंच्छिद्र पाखरे, अँड. संदिप ढाकरे, प्रभुलाल झलवार, कुष्णा ढाकरे, अँड. सचिन ढाकरे, संतोष नैनाव, रामदास आगवाल , अशोक ढाकरे, दिपक झलवार, शुभम ढाकरे,  गौरव माहोर, कचरू बालोदे, किशोर ढाकरे, संतोष बालोदे, प्रसन्नजित माहोर, जगदिश माहोर आदीसह समाजबांधवांच्या स्वाक्शर्या आहेत.
>
> --------------_-------------
> सोबत फोटो
> पद्मवंशिय तेली समाजाच्यावतीने तहसिलदाराना निवेदन देताना प्रदिप ढाकरे, डाँ. अार.एन झलवार आनंदा माहोर, डाँ. गणेश दसरे, डाँ . मंच्छिद्र पाखरे अँड. संदिप ढाकरे आदीसह समाज बांधव दिसत आहे.

Tezznews24 web news channel

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें