- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 26 जनवरी 2018

निरोगी शरीर प्राप्त करण्याची पहिली पायरी सूर्यनमस्कार - डॉ.विनायकराव   कोठेकर
सेलू / प्रतिनिधी
जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त बुधवारी ( ता.२४ ) येथील  स्वामी विवेकानंद विद्यालयात विध्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार काढले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य  डॉ. विनायकराव कोठेकर हे होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की ,सूर्यनमस्कार हा विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त व्यायाम असल्याने त्याची नियमित उपासना करणे आवश्यक आहे.कारण सूर्य हा तेजाचे प्रतिक असुन ,ऊर्जेचा स्रोत आहे.सूर्य हा बल ,शक्ती ,तेज ,ओज ,शौर्य ,बुद्धी ,जीवन असून सूर्याशिवाय सृष्टीची कल्पना शक्य नाही. तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या सूर्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच खरी संधी आहे असे प्रतिपादन केले.
व्यासपीठावर हरिभाऊ चौधरी , भारतीय जीवन विमा निगम चे उपेंद्र बेलुरकर ,डॉ. किशोरजी जवळेकर ,सुधीरराव चौधरी ,किरणराव डुघरेकर ,मु.अ. अनिल कौसडीकर यांची उपस्थिती होती.उपेंद्रजी बेलुरकर व डॉ.किशोरजी जवळेकर यांनी मनोगत व्यक्त केले.योगशिक्षिका सौ.अरुणा थोरे यांचा सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन विनोद मंडलिक ,आभार गजानन साळवे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय चौधरी ,शंकर राऊत ,दिपाली भावसार ,रागिणी जकाते ,दिपाली पवार ,संध्या शोभने ,चेतन नाईक ,सतीश भुजबळ ,काशिनाथ पांचाळ ,श्रीपाद जोशी ,सेवक दत्ता गिरी यांनी परिश्रम घेतले .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें