- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 26 जनवरी 2018

*कु.शिवानी लघें व कु .अनुराधा शेळके उत्कृष्ट वाचक पुरस्काराने सन्मानित*

*वाचन हा स्वतः ला प्रगल्भ बनविण्याचा सोपा मार्ग*
          --   *युवराज माने*

*उत्कृष्ट वाचक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते  वितरीत*

*राजमाता जिजाऊ फाउंडेशन मगरवाडी ,ता.अंबाजोगाई जि बीड*  च्या वतीने दिल्या जाणाऱ्या *उत्कृष्ट वाचक पुरस्काराचे  वितरण भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज  जि प प्रा शाळा पारडी येथे करण्यात आले . याप्रसंगी  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून *सरपंच अश्विनीताई राठोड, पुरस्कार वितरक म्हणून राजमाता जिजाऊ फाउंडेशन च्या सचिव पूनम माने ,प्रमुखपाहुणे म्हणून पोलीस पाटील साहेबराव राठोड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल आढे, उप सरपंच बायनाबाई राठोड, मुख्याध्यापक कुरेशी, माउली राठोड , रावसाहेब लघें, राजू आढे, आदी मान्यवर उपस्थित होते .

यावर्षी दोन शाळांची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली होती .यात जि प प्रा शाळा पारडी, केंद्र वालुर ता .सेलू जि .परभणी.  व जि प शाळा मगरवाडी ,केंद्र अंबाजोगाई  ता.अंबाजोगाई  जि बीड . सदरील शाळेतील जवळपास 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यातून  6 वाचकांची निवड करण्यात आली. यात पारडी शाळेतील कु.शिवानी शिवाजी लघें ,अनुराधा शेळके व उतेजनार्थ कु.निकिता राठोड या तीन विद्यार्थ्यांची  निवड करुन   आज मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, ग्रंथ व पुष्पगुच देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना युवराज माने म्हणाले,"वाचन हा स्वतः ला प्रगल्भ बनविण्याचा सोपा मार्ग आहे"
या शाळेत शिकत असलेल्या मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी , मुलांचा स्वतः चा ग्रन्थ संग्रह व्हावा , भविष्यात त्यांना वाचनाचा फायदा व्हावा व वाचन चळवळ उभी राहावी यासाठी राजमाता जिजाऊ फाउंडेशन गेली सहा वर्षांपासून वेगवेगळ्या शाळांची निवड करून हा अभिनव उपक्रम राबवत आहे" .

गेल्यावर्षी वालुर केंद्रातील तीन वाचक विध्यार्थ्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता .

अश्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ फाउंडेशन समाजिक बांधीलकी जोपासत आहे . वाचकांचा उत्तम प्रतिसाद पाहून पुढील वर्षी  उत्कृष्ट वाचक पुरस्काराची व्याप्ती वाढविली जाणार आहे . असे प्रतिपादन फाऊंडेशनचे प्रवक्ते युवराज माने यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें