- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 26 जनवरी 2018

*हुंडयाचे पैसे आणुन दे म्हणून सासरच्यांनी पाजले विवाहितेस विष, मुलांसह केली हत्या*
-------------------------------------------------------------------------------------

तालुक्यातील गौंडगांव येथील घटना
----------------------------------
सोनपेठ(राजेश खेडकर)
हुंड्याचे बाकी राहिलेले एक लाख पासष्ट हजार रूपये आणुन दे म्हणून तालुक्यातील गौंडगांव येथील विवाहितेसह तिच्या दोन लेकरांना जीवंत मारुन टाकल्याची घटना नुकतीच घडली असून यात विवाहितेसह दोन मूलांचे निधन झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,
सोनपेठ तालुक्यातील पोहंडुळ येथील अर्जुन बळीराम जाधव यांची मुलगी पद्मीनबाई भगवान कराळे (वय २६) हीचे लग्न २०१० मध्ये पोहंडुळ येथून जवळच असलेल्या गौंडगांव येथील जगन्नाथ कराळे यांचा मुलगा भगवान याच्यासोबत झाला होता. मात्र कन्याधन रूपाने राहिलेले एक लाख पासष्ट हजार रूपये आणुन दे म्हणून पद्मिन हिचा तीच्या सासरच्या लोकांनी वारंवार छळ करुन यापूर्वी २०१२ व २०१३ मध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र यात पद्मिन ही गंभीर जखमी झाली होती. मात्र यापुढे आपल्या मुलीचा संसार मोडू नये म्हणून जाधव यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली नसल्याचे दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. सोमवार रोजी रात्रौ १० वाजता स्व:तच्या घरी पद्मिन व तीची मुलगी संध्या (वय ६वर्षे) व मुलगा अगस्ती (वय ३ वर्षे) या तिघांना घरच्यांनी विष पाजुन त्यांची हत्या केल्याची तक्रार नुकतीच सोनपेठ पोलीसात करण्यात आली आहे. दरम्यान लग्नानंतर काही दिवस कराळे यांनी पद्ममीन हीस चांगले वागवले होते. परंतु काही दिवसानंतर पद्मजा हिचा कौटुंबिक छळ चालूच होता. यापूर्वीही दोनवेळा पद्मजास मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यात एक वेळा तीचा हात व पाय मोडल्याची घटना घडली होती. त्यानंतर अंगारयातुनही तिच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याची फिर्याद अर्जुन जाधव यांनी दिली असून आरोपी सासरा जगन्नाथ भानुदास कराळे (वय६२ वर्षे), सासु निलावंती जगन्नाथ कराळे (वय ५८), नवरा भगवान यांना ताब्यात घेतले असून याच्यावर सोनपेठ पोलीसात भा.द.वी.नुसार ३०२,३०४ ब,४९८अ,३२३,(३४)गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा पुढील तपास सोनपेठचे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ हे करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें