आमदार मोहन फड याच्यां वाढदिवसानिमित्त १०१ गरजु रुग्ण उपचारासाठी मुंबईला रवाना.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०२: काल दि.०१ जानेवारी रोजी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहन फड साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने मतदारसंघातील गरीब व गरजू १०१ रुग्णांना महिलांच्या गर्भपिशवी च्या शस्त्रक्रियासाठी आमदार मोहन भाऊ यांच्या स्वखर्चाने मुंबई येथिल डी. वाय.पाटील हॉस्पिटल नेहरुळ नवी मुंबई येथे मानवतरोड रेल्वे स्टेशन वरून तपोवन एक्सप्रेस ने रवाना करण्यात आले.
याकरिता आमदार मोहन भाऊ यांच्या पत्नी सौ,मेघाताई मोहनराव फड यांनी मागील १ महिन्या पासून स्वतः मतदारसंघातील चार ही तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या प्रत्येक गावातील आरोग्यसेविका यांच्या साह्याने हे उपक्रम घेऊन त्यांच्या सर्व प्रकारच्या टेस्ट करून त्यांचे रिपोर्ट नुसार रुग्णाना मुंबई येथे पाठविण्यात आले.यावेळी सौ,मेघा मोहनराव फड,सौ,गयाबाई माधवराव फड,सौ,मीराताई दिलीपराव मुरकुटे यावेळी उपस्थित होत्या
या रुग्णाना उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी राहुल दहिवाल, पप्पू नखाते,विलास जंगले,परमेश्वर थोरात,दत्ता गायकवाड, हाक्कीम आतार ही टीम रुग्णानच्या सोबत गेली आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें