- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 2 जनवरी 2018

भिमा कोरेगाव येथील भ्याड हल्याच्या निषेधार्थ मानवत बाजारपेठ कडकडीत बंद!
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०२: भिमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला मानवंदना देण्याकरिता गेलेल्या भिम अनुयायांवर मनुवाद्यांनी दि.०१ जानेवारी रोजी मानवंदना देत असताना भ्याड हल्ला केला यात अनेक अनुयायी जख्मी झाले याच्या निषेधार्थ मानवत येथील आंबेडकरी जनतेच्या वतीने या घटनेचा निषेध म्हणुन आज दि.०२ जानेवारी रोजी मानवत बंदची हाक दिली होती यास प्रतिसाद म्हणुन शहरातील व्यापाऱ्यानी आपली प्रतिष्ठाने बंद करुन सहकार्य केले.हा मोर्चा सकाळी ११ वाजता आंबेडकर चौक येथुन निघुन मेनरोडावरुन होत तहसिल कार्यालयावर धडकला व येथे याचे रुपांतर सभेत झाले.यावेळी चळवळीतील नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .यावेळी नायबतहसिलदार नुकुल वाघुंडे यांना निवेदन देण्यात आले.तहसिलदार मानवत मार्फत महामहिम राष्टृपती यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की,विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर याच्यां परंपरेनुसार प्रत्येक वर्षि भिमा कोरेगाव येथे देशातुन विजय स्तंभाला मानवंदना देण्याकरिता  लाखो अनुयायी उपस्थीततांना राहुन मानवंदना देत असतात या परंपरेनुसार याही वर्षि १ जानेवारी रोजी मानवंदना चालु असताना मनुवाद्यांनी भिम अनुयायांवर भ्याड हल्ला केला यात अबाल वृध्द ,लहान बालके व स्ञीया जख्मी झालेल्या आहेत.या घटनेचा मानवत तालुक्यातील समस्त भिम अनुयायी निषेध व्यक्त करत असुन मा.राष्टृपती कोंविद यानी आपल्या आदेशाने मागासवर्गियावर व भिम अनुयायांवर सध्या मनुवाद्याच्या राज्यामध्ये होत असलेले हल्यास पायबंद करावेत .भिमा कोरेगाव येथील भ्याड हल्ला करणाऱ्या मनुवाद्यावर अनुसुचित जाती जमाती कायद्याअंतर्गत भा.द.वि.कलम ३०७ व ३०२ नुसार कारवाई करण्याचे आदेश द्यावे असे म्हटले आहे.या निवेदनावर अमृतराव भदर्गे ,अशोक पंडित ,आनंद भदर्गे ,राजकुमार खरात,चंद्रकांत मगर,महेद्र ठेगे,दिपक ठेंगे ,संपत पंडित ,शैलेश वडमारे,विशाल धापसे,सत्यशिल धबडगे ,धगन भदर्गे ,नागसेन भदर्गे ,शेख आफरोज,दिपक पाटिल आदिच्या स्वाक्षरी आहेत.हा निषेध मोर्चा शांततेत पार पडला.या मोर्चात कोणताही अनैतिक प्रकार घडु नये यासाठी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबंस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनामुळे सकाळपासुनच  एस.टि.बंद असल्याने शाळकरी विद्यार्थिसह प्रवाशाचे फार हाल झाले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें