- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 30 जनवरी 2018

सोनपेठ येथे पुस्तके भेट देऊन वाढदिवस साजरा करण्याची परंपरा कायम
--------------------------------------------------------
कु.छाया शिवाजीराव सातपुते हिने केले वाढदिवसा निमित्त ग्रंथदान
--------------------------------------------------------
सोनपेठ (राजेश खेडकर)
सोनपेठ शहर व तालूक्यात विविध प्रसंगी ग्रंथदान करून लोप पावत चाललेली वाचन संस्कृती पुनर्जिवीत करण्याचे प्रयत्न सातत्याने चालू आहेत. तालूक्यातील अनेक शाळेतील मुलेही त्यांचा वाढदिवस गोळ्या व चॉकलेट न देता शाळेच्या ग्रंथालयास पु्स्तके भेट देऊन साजरा करीत आहेत.
अशाच प्रकारे आज दि.३० जानेवारी २०१८ रोजी शहरातील श्री महालिंगेश्वर विद्यालयाच्या इयत्ता नववी (ब) मध्ये शिकत असलेल्या कु.छाया शिवाजीराव सातपुते या विद्यार्थिनीने तिचा वाढदिवस विद्यालयाच्या ग्रंथालयास पुस्तके भेट देऊन साजरा केला आहे.यावेळी विद्यालयाचे ग्रंथपाल आर.एस.खेडकर, ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठचे सदस्य एन.एम.निळे व सहशिक्षक एम.एस.अलमलकर यांची उपस्थिती होती.
वाढदिवसा निमित्त विद्यालयाच्या ग्रंथालयास पुस्तके भेट दिल्याबद्दल ग्रंथपाल खेडकर यांनी कु.छाया सातपुते हिचे आभार व्यक्त करून वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें